मुरबाड (प्रतिनिधी) - कृषी विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा कृषी संजीवन मोहिमेचा समारोप कृषी दिन 2 जुलै रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार...
मुरबाड (प्रतिनिधी) - कृषी विभागाने आयोजित केलेल्या जिल्हा कृषी संजीवन मोहिमेचा समारोप कृषी दिन 2 जुलै रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुरबाड मधील आंबेले खुर्द येथील तरुण शेतकरी संतोष परटोळे यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि एक वृक्ष देऊन प्रगतशील शेतकरी या पुरस्काराने गौरविण्यात आले. पारंपरिक शेती पद्धती व आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित उपयोग करून शेती उत्पन्नात वाढ करण्यात यश मिळविल्याबद्दल तसेच परिसरातील शेतकऱ्यांना याबद्दल मार्गदर्शन करून त्यांना सहकार्य केल्याबद्दल संतोष परटोले यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषि सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषद कृषि अधिकारी श्रीधर काळे, आणि कृषिरत्न पुरस्कार विजेते आणि कृषीतज्ञ शेखर भडसावळे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे आणि . भागवत यांनी कृषी क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सुचवलेले पर्याय वापरून शेती करण्याची गरज असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यासोबतच त्यांनी शोधलेल्या एसआरटी पद्धतीने भातशेती केल्याने शेतकऱ्यांचे श्रम वाचतील, पैसे वाचतील आणि त्याला जास्त उत्पन्न मिळू शकेल त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्यात आधी भात आणि नाचणी ही दोनच पिके घेतली जायची मात्र आता भेंडी, भोपळी मिरची, काकडी, हळद अशी अनेक पिकं घेतली जातात. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन केल्यानेच आज यातील काही भाजा परदेशात निर्यात होत आहेत. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, स्थानिक हवामान पाहून त्यानुसार पिकांचे पॅटर्न ठरवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS