शिरूर ( प्रतिनिधी ) - कारेगाव येथील गायरान जमिनीशी माझा अथवा माझ्या परिवाराचा कोणताही सबंध नाही. गट नं ६९८ मधील विक्री केलेल्या जागेचा त...
शिरूर ( प्रतिनिधी ) - कारेगाव येथील गायरान जमिनीशी माझा अथवा माझ्या परिवाराचा कोणताही सबंध नाही. गट नं ६९८ मधील विक्री केलेल्या जागेचा ताबा मोजणी करूनच दिले गेले आहेत. माजी सरपंच अनिल नवले हे राजकीय द्वेशातून आरोप करत आहेत असा आरोप ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभवामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत.माझ्या पणजोबा पासून सामाजिक, राजकीय वारसा आहे. त्यांचा गावच्या विकासात मोठा वाटा आहे त्यामुळेच कारेगावच्या जनतेने मला बिन विरोध निवडून दिले.ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवं युवकांना जनतेने निवडून देत एक हाती सत्ता दिली आहे.हे माजी सरपंच यांना पचणी पडत नसल्याचे संदीप नवले यांनी सांगितले.
गट नंबर ६९८ माझ्या मालकीची आहे. या जमिनीची ज्या भागाची विक्री केली त्या भागातच ताबे दिले आहेत. याचे पुरावे माझ्याकडे आहेत.यात कुठलेही काळेबेरे नसून गायरान जमीन गट नं ७०९ मोजणी बाबत कुठलाही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आम्ही केला नाही.मी जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही या पुढेही करनार नाही.
माजी सरपंच यांनी मी निवडणुकीत पराभव झाला म्हणून राजकीय द्वेषातून आरोप करत नाही असे म्हटले आहे. हे साफ खोटे आहे. तुम्ही केलेले आरोप हे राजकीय द्वेषातूनच केले आहेत.त्यांनी चार ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. ग्रामपंचायत कारेगाव हद्दीत अनेक गायरान जमिनीचे गट आहेत परंतु तुमचे गट नं ७०९ वर अधिक प्रेम का आहे हे दिसून येत आहे.
या अगोदर कारेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर सर्व पराभूत व विजयी उमेदवार खेळीमेळीने गावच्या विकासासाठी एकत्र येत होते. कोणीही अश्या प्रकारचे घाणेरडे राजकारण केले नाही. परंतु या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर मात्र अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. हे आपल्याला न शोभणारे आहे.यातून गावची बदनामीच होत आहे.असे प्रकार त्यांनी थांबवावेत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
माजी सरपंच यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जे तक्रारी केल्या आहेत त्यातच त्यांचे पितळ उघडे पडले आहे.असे संदीप नवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
COMMENTS