शिरूर (प्रतिनिधी) - शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच अनिल नवले यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला ...
शिरूर (प्रतिनिधी)-
शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच अनिल नवले यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असुन त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांना निवेदनद्वारे केली आल्याची माहिती सरपंच निर्मला नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनेक कामामध्ये अनियमितता दिसत असुन टेंडर मंजुर करते वेळी संपुर्ण रक्कम मोकळी ठेवण्यात आली असुन तशीच बिले काढण्यात आली, टेंडर मध्ये आय. एस .आय या प्रतीची पाईप असावेत असा उल्लेख असताना सुध्दा कमी दर्जाचे पाईप आणुन जागेवरच आय.एस.आय चे शिक्के मारण्यात आले असल्याचे दिसत आहे.तशेच प्रोसेडींग बंद केले नाही.हार्डवेअर व कॅमेरे खरेदीबाबत मोठा भ्रष्टाचार झाला असुन या सर्व विकास कामांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच निर्मला नवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
तत्कालीन सरपंच अनिल नवले यांनी ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० मध्ये केलेल्या ५० कोटींच्या विकासकामा मध्ये भ्रष्टाचार केल्याचा प्रथमदर्शनी दिसत असुन या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी. या कालावधी मध्ये केलेल्या विकास कामांची खाजगी ऑडिट करणेसाठी ग्रामपंचायतीस परवानगी द्यावी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती विजयसिंह नलावडे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली असल्याचे उपसरपंच अजित कोहकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी निर्मला शुभम नवले सरपंच कारेगाव ,अजित प्रल्हाद कोहकडे (उपसरपंच, कारेगांव) , संदिप विश्वास नवले. (ग्रा. प. सदस्य कारेगांव), नागेश सर्जेराव शेलार (ग्रा.प.सदस्य, कारेगांव) प्रियंका संदिप गवारे (ग्रा .प.सदस्या कारेगाव) ,हौसाबाई लाला जगताप (ग्रा. प. सद्स्य, कारेगाव) ,सोनाली विकास नवले (ग्रा प . सदस्य कारेगाव), तुषार प्रकाश नवले. (ग्रा.प. सदस्य कारेगाव),शहाजी पोपट तळेकर (ग्रा पं. सदस्य कारेगाव,उद्योजक शुभम नवले आदी या वेळी उपस्थित होते .
भ्रष्टाचाराची आपणा मार्फत पंधरा दिवसात सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही न झाल्यास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे सर्वजण पंचायत समिती कार्यालय शिरूर येथे उपोषणास बसणार
सरकारी ऑडिट करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू
याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सरपंच, उपसरपंच आणि ग्रा पं सदस्य यांनी मागणी केल्याप्रमाणे कारेगाव ग्रामपंचायतचे ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० या ५ वर्षाचे सरकारी ऑडिट करण्यात येईल तसेच त्यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
विजयसिंह नलावडे गटविकास अधिकारी शिरूर
COMMENTS