शिरूर (प्रतिनिधी) - कारेगाव ता शिरूर येथे शासनाची गायरान जमीन 52 गुंठे आहे. ज्या जमिनीवर गावातील काही आमच्या गावातील लोकांची घरे आहे. या घ...
शिरूर (प्रतिनिधी)- कारेगाव ता शिरूर येथे शासनाची गायरान जमीन 52 गुंठे आहे. ज्या जमिनीवर गावातील काही आमच्या गावातील लोकांची घरे आहे. या घरांचे गावठाणात रूपांतर व्हावे यासाठी मी सरपंच आसताना प्रयत्न केले आहे. तसा ठराव करून शासनास पाठवला आहे. हे सर्व मी भूमिहीन, गरिबांना हक्काचे घर होण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.मग याच लोकांची घरे पाडून बेघर कसा करेन असा सवाल भाजपचे पुणे जिल्हा सचिव तथा माजी सरपंच अनिल नवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
मी स्थानिक नागरिकांच्या नेहमीच पाठीशी राहिलो आहे. मी सरपंच असताना पावणे दोन कोटींचा झालेला भ्रष्टाचार बाहेर काढला आहे.माझा पराभव झाला किंवा राजकीय द्वेशातून हे काम करतोय हे चुकीचे आहे.निवडणुकीत जय-पराजय होत असतो. मी गावचा एक रुपया देखील कोणाला खाऊन देणार नाही. मी जातीयवादी राजकारण कधीच केले नाही.केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी व आपली कातडी वाचवण्यासाठी काही लोकांचा हा खेळ सुरु असून यासाठी शाळे शेजारी असणाऱ्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्याला बरोबर घेऊन शासनास व प्रशासनास वेठीस धरून काम करत आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील जमीन गट नंबर ६९८ जागा घेतला परंतु शासकीय गायरान जमीन गट नंबर ७०९ मध्ये लोकांनी ताबा घेतला ती जमीन पुन्हा शासनाला मिळावी यासाठी माझा लढा आहे. माझ्या गावातील गोरगरीब समाजाची घरे काढण्याचा कुठलाही उद्देश नाही ही घरे कायम होण्यासाठी मी व माझ्या सहकार्यांनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे. मी केलेले आरोप बिनबुडाचे नाहीतर सत्य आहेत आणि सत्य नेहमीच कडवे असते हे लक्षात ठेवा असा सल्लाही कारेगावचे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव अनिल नवले यांनी विरोधकांना दिला आहे.
गट नंबर 698 जमिनीची विक्री करून गट नं 709 या शासकीय गायरान जमिनीवर ताबा दिला आहे. शासनाची 52 गुंठे गायरान जमिनी बाबत कारेगाव येथील तलाठी यांनी ८ एप्रिल २०२१ रोजी पंचनामा केला असता या त्यांच्या असे निदर्शनास आले आहे की शेजारील गट खरेदी करून देऊन गट नंबर ७०९ सरकारी जागेत ताबा दिल्याची शक्यता त्यांनी वर्तविली असून त्यामुळे या जागेची मोजणी करावी अशी मागणी तहसीलदार शिरूर यांच्याकडे केली असता शिरूरच्या तहसीलदार यांनी २३ एप्रिल २०२१ रोजी या जागेची मोजणी करावी म्हणून शिरूर भुमिअभिलेख उपधीक्षक यांना पत्र दिले आहे. काही लोकांनी स्वतःच्या पोळी भाजण्यासाठी इतर नागरिकांची फसवणूक करून गट नं 709 जागेवर ताबा देऊन चाळी बांधल्या आहेत त्या काढा त्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे असेही माजी सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.
कारेगाव येथील प्राथमिक रुग्णालयासाठी आंबेगाव शिरूर चे आमदार व राज्याचे गृहमंत्री यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. परंतु कारेगाव ग्रामपंचायतीचे एक सदस्य व 698 जमीन मालक यांनी प्राथमिक रुग्णालयासाठी जागा तजवीज केली आहे असे सांगितले आहे. जागा कोठे आहे याबाबत जाहीर खुलासा फलक लावून करावा असे आवाहनही माजी सरपंच अनिल नवले यांनी केले आहे.
मी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीचा पावणे दोन कोटी चा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. मी केवळ गावाच्या हिताचा व कुणीही गावाचे पैसे खाऊ नये भ्रष्टाचार करू नये ही भूमिका कायम घेतली आहे. हे लक्षात ठेवा गावच्या हिताच्या व गावाची जमीन गावाला परत मिळावी ही माझी मागणी आहे जर 15 जुलैपर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यास शिरूर तहसील कार्यालय यापुढे अमरण उपोषण करणार असल्याचे माजी सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.
COMMENTS