शिरूर ( प्रतिनिधी ) - कारेगाव (ता. शिरुर) येथील गट क्र. ६९८ मधील खाजगी जमीन विकुन त्याचा ताबा सरकारी गायरान जमीन गट क्र. ७०९ मध्ये दिला ज...
शिरूर ( प्रतिनिधी ) - कारेगाव (ता. शिरुर) येथील गट क्र. ६९८ मधील खाजगी जमीन विकुन त्याचा ताबा सरकारी गायरान जमीन गट क्र. ७०९ मध्ये दिला जात असल्याचा माजी सरपंच अनिल नवले यांचा आरोप चुकीचा व बिनबुडाचा असून गट क्र. ६९८ हा माझ्या कुटुंबियांच्या नावे असून सदर गटामधील काही क्षेत्र माझ्या कुटुंबीयांनी विक्री करताना त्याचा ताबा वेळोवेळी मोजणी करुनच दिलेला आहे. त्यामुळे अनिल नवले यांनी माझ्या कुटुंबीयांची बदनामी थांबवावी. तसेच माझ्या कुटुंबियांना विनाकारण या प्रकरणात ओढु नये, असे मत ग्रामपंचायत सदस्य संदीप नवले यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केले.
पुढे बोलताना संदीप नवले म्हणाले कि, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनिल नवले हे ज्या वार्ड मध्ये निवडणुकीसाठी उभे होते त्यामध्ये गट क्र. ७०९ हा येतो. त्या गटामध्ये अनुसुचित जाती-जमातींच्या लोकांचे मतदान आहे. तसेच त्या लोकांचे या गटात वास्तव्य आहे. अनिल नवले यांचा या वार्ड मध्ये दारुण पराभव झाला त्याचाच राग मनात धरुन अनिल नवले राजकीय द्वेषातुन हे भंपक पणाचे आरोप करत आहेत. तसेच निवडणुकीत पराभव झाल्याने अनुसुचित जाती-जमातींच्या लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत.
गायरान जमीन गट क्र. ७०९ मध्ये अनिल नवले यांनी शासकीय आरोग्य उपकेंद्रासाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना संदीप नवले म्हणाले राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर आंबेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे (पाटील) यांच्या प्रयत्नातुन कारेगाव उपकेंद्रासाठी दिड कोटींचा निधी मंजुर झाला असुन आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतने जागेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गट क्र. ७०९ मध्ये असलेल्या गोरगरीब जनतेची घरे पाडुन अनिल नवले काय साध्य करु इच्छित आहेत.
जातिभेद करत आहें
ReplyDelete