शिरूर ( प्रतिनिधी ) - गायरान जमिनीची मोजणी प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठी माझ्यावर केलेले आरोप बालिशपणाचे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य ...
शिरूर ( प्रतिनिधी ) - गायरान जमिनीची मोजणी प्रकरणातून लक्ष विचलीत करण्यासाठी माझ्यावर केलेले आरोप बालिशपणाचे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे कारेगाव चे माजी सरपंच अनिल नवले यांनी जागृत शोधशी बोलताना सांगितले.
सरपंच, उपसरपंच यांनी अभ्यास करून आरोप करावेत वास्तविक पाहता ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा टर्नवर ३० ते ३२ कोटी चा आहे मग पन्नास कोटी आले कोठून असा सवाल त्यांनी केला. सौर प्रकल्प माझ्या काळात झाला नसून तो माझ्या अगोदरच्या कार्य काळात झालेला आहे. माझ्या काळात तत्कालीन सरपंच उपसरपंच यांनी केलेला लाखोंचा भ्रष्टाचार बाहेर काढला असल्याचे त्यांनी सांगितले.
कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये एप्रिल २०११ ते २३ ऑगस्ट २०१५ काळामध्ये तत्कालीन सरपंच उपसरपंच यांनी विविध विकास कामे करताना व सुमारे ८५ ते ९० लाख रुपयांची सोलर दिवे खरेदी चे बिले काढल्याचे दिसून येत आहे मात्र प्रत्यक्षात गावामध्ये कुठेही सोलर दिवे लावण्यात आलेले नाहीत. फक्त खरेदी बिले जोडले असल्याचे दिसत आहे. सदरील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल नवले यांनी शिरूर चे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी सरपंच अनिल नवले म्हणाले की सध्या ग्रामपंचायतीमध्ये दप्तर तपासणी सुरू आहे. या दप्तर तपासणी दरम्यान ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उपसरपंच तसेच सरपंचाचे पती हे शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे काम करत असून या गंभीर घटनेची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
COMMENTS