शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर तालुक्यातील घोडधरणाजवळ चिंचणी हे गाव आहे. या गावात खूप जुने जागृत असे श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी ...
शिरूर ( प्रतिनिधी ) -
शिरूर तालुक्यातील घोडधरणाजवळ चिंचणी हे गाव आहे. या गावात खूप जुने जागृत असे श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचे मंदिर आहे. येथे दरवर्षी मोठया प्रमाणात गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेनिमित्त काळभैरवनाथ मंदिरामध्ये हजारो भाविक श्रद्धेने सहभागी होतात. परंतु कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षांपासून गुरु पौर्णिमेचा उत्सव अगदी साध्या पद्धतीने होतो. फक्त मंदिराचे पुजारी व काही निवडक ग्रामस्थ यांच्या उपस्थित काळभैरवनाथ महाराज जोगेश्वरी मातेची महापूजा व व्यासऋषीं यांची पुजा करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारी परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतून सावरण्याची व आलेले संकट दूर करण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. कोरोना महामारी आपल्या देशातून निघून जावे व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे अशी प्रार्थना श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी मातेजवळ केली असल्याचे येथील पुजारी श्री संभाजी तात्या पवार यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS