Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची 'सरहद'ची भूमिका कौतुकास्पद -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

  कारगिल गौरव पुरस्काराचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील हस्ते वितरण पुणे ,(प्रतिनिधी) -  कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी ,  देशप्रेमासाठी ,  र...


 कारगिल गौरव पुरस्काराचे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील हस्ते वितरण


पुणे,(प्रतिनिधी) कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठीदेशप्रेमासाठीराष्ट्रभक्तीसाठीवंचितांसाठी काम करण्याची सरहदची भूमिका महत्वा  ची आहेअसे कौतुकोद्वार गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.

            सरहदपुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने  कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्व निमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी कारगिलचे एक्झीक्युटीव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवीपिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशतेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयलआयोजक संतसिंग मोखा,  सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.

            गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, 22 वर्षापूर्वी कारगीलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. कारगिल प्रदेशाची जोडलेल्या मुला-मुलींना इथे आणून त्यांना शिक्षण देण्याचे काम सरहद संस्थेच्यावतीने केले जाते. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतातपरंतु पुरस्काराचे महत्व्  पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेतअसे सांगून ते पुढे म्हणालेसमाजाच्या हिताच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. एखादे विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. यातून एक नवीन आदर्श निर्माण होतो. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याने मनाला आनंद होतो. अशा कार्यक्रमात अधिकाधिक सहभागी झाले पाहिजे.

            अतिवृष्टीपुराचे संकट महाराष्ट्रातील जनतेवर आले आहे. दरड कोसळून अनेक निष्पाप जीव गेले त्यांच्याप्रती श्री.वळसे- पाटील यांनी सहवेदना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणालेनैसर्गिक संकट असो अथवा देशाच्या सीमेवरील संकट असो. संकटाचा सामना धैयाने केला पाहिजे. संकटाला तोंड देण्याचे काम त्या-त्या क्षेत्रात काम करणारे करत असतात. सरहद संस्थेच्या कार्याला सतत सहकार्य राहील असे सांगून कारगिल गौरव पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले.

            यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी (एक्झीक्युटीव्ह काँन्सिलरलेह-कारगिल)डॉ. अपश्चिम बरंठ (कोवीड मालेगाव पॅटर्न)डॉ. विजय कळमकर (कोवीड मालेगाव पॅटर्न)डॉ. अनिल पाचणेकर (धारावी पॅटर्न)राकेश भान (मॅनेजिंग डायरेक्टर फिशर ग्रुप)उमा कुणाल गोसावी (शौर्य पदक विजेता वीरजवान पत्नी)डॉ. सतिश देसाई (अध्यक्ष-पुण्यभूषण फाऊंडेशन) आणि विजय बाविस्कर (समूह संपादक- लोकमत) यांना श्री. दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची 'सरहद'ची भूमिका कौतुकास्पद -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची 'सरहद'ची भूमिका कौतुकास्पद -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
https://1.bp.blogspot.com/-PRlpjz8Qlmg/YP5jzE2oalI/AAAAAAAAFkY/V9Rumv6M_tsS8JfHEcihf-WPKhITaY_YwCLcBGAsYHQ/s320/SAVE_20210726_125327.jpg
https://1.bp.blogspot.com/-PRlpjz8Qlmg/YP5jzE2oalI/AAAAAAAAFkY/V9Rumv6M_tsS8JfHEcihf-WPKhITaY_YwCLcBGAsYHQ/s72-c/SAVE_20210726_125327.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/07/Grahmantri%20Dilip%20Valase%20Patil%20.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/07/Grahmantri%20Dilip%20Valase%20Patil%20.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content