मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - ठाणे जिल्ह्यातील कसारा ते कर्जत ही रेल्वे स्थानके जोडणारा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आमदार क...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - ठाणे जिल्ह्यातील कसारा ते कर्जत ही रेल्वे स्थानके जोडणारा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे, याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील ही उपस्थित होते,
मुबई व नाशिक या शहरावर रेल्वे प्रवाशी संख्येचा वाढता ताण पाहता आणि या मार्गावरील रेल्वे प्रवशांची वाढती संख्या लक्षात घेता ,कर्जत ते कसारा असा जोड रेल्वे मार्ग मंजूर केल्यास त्याचा फायदा पुणे व मुंबई शहरात ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे, नाशिक हुन पुणे येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना कल्याण येथे येऊन पुढील प्रवास करावा लागत आहे, हीच आवस्था पुणे हुन नाशिक कडे जाणाऱ्या प्रवाशांची आहे, कर्जत कसारा रेल्वे मार्ग माल वाहतुकीसही सोयीचा होणार आहे, कर्जत पनवेल जेएनपीटी असा रेल्वे मार्ग उपलब्ध असल्याने मालवाहतूक सेवेला त्याचा फायदा होऊ शकणार आहे, यासाठी हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे, असे आमदार किसन कथोरे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रही मागणी केली,
कर्जत कसारा रेल्वे मार्गामुळे कर्जत, मुरबाड, शहापूर, इगतपरी, अंबरनाथ कल्याण या तालुक्याच्या ग्रामीण भागाला रेल्वेची दळणवळण सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे, या भागात सध्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि अधोगिकीरण सुरू आहे, कर्जत कसारा रेल्वे मार्गामुळे या भागाच्या विकासालाही चालना मिळणार आहे, असे आमदार किसन कथोरे यांनी निवेदनात म्हटले आहे,
COMMENTS