मरबाड (प्रतिनिधी) प्राणिक हिलींग ग्रुप मुरबाड म्हणजे सपूर्ण मुरबाड तालुक्यात एक चांगल्या प्रकारची समाजसेवा करणारा हा ग्रुप ऑक्टोबर 20...
मरबाड (प्रतिनिधी) प्राणिक हिलींग ग्रुप मुरबाड म्हणजे सपूर्ण मुरबाड तालुक्यात एक चांगल्या प्रकारची समाजसेवा करणारा हा ग्रुप ऑक्टोबर 2016 पासून मुरबाड तालुक्यात या ग्रुप ची पाया मुले रुजली गेली आणि या आजपर्यंत आज या ग्रुप च्या माध्यमातून अनेक समजउपयोगी अशी चांगली कामे झाली आहेत आणि यापुढेही अशीच चांगल्या प्रकारची समाजाउपयोगी कामे अविरत होत राहतील
प्राणिक हिलींग ग्रुप यांच्या मार्फत ऑक्टोबर 2016 मध्ये मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावात एका सामाजिक उपक्रमाला प्राणिक आरोग्यम ठाणे यांच्या माध्यमातून व प्राणिक हिलींग ग्रुप मुरबाड यांच्या मदतीने सुरुवात झाली आणि 45 गरीब गरजू कुटुंबाना किमान महिनाभर पुरेल इतका किराणा समान देण्यात आला व आजपर्यंत 100 हुन अधिक खेड्या पाड्यात वाडी वस्त्यांत आणि टोकावडे वैशाखरे धसई चासोले खुंटल न्याहाडी शिरोशी तळेगाव या परिसरात आजपर्यंत हे काम अविरत चालू आहे सुरुवातीला प्राणिक हिलींग ग्रुप मुरबाड च्या वैशाखरे गावातील पेशाने शिक्षक असणाऱ्या विराज घरत सरांनी त्यांच्या कुटुंबाच्या , एका विद्यार्थ्यांच्या व 2 स्वयंसेवकांच्या सहकार्याने सुरुवात केलेल्या या ग्रुप मध्ये आज 50 हुन अधिक स्वयंसेवक काम करत आहेत प्राणिक हिलींग ग्रुप व प्राणिक आरोग्यम सेंटर यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम करण्यात आले ज्यामध्ये किराणा सामान वाटप कपडे वाटप वनराई बंधारे बांधणे वृक्षारोपण करणे अशी अनेक प्रकारची सामाजिक व पर्यावरण पूरक कामे करण्यात येत आहेत. अशी माहिती प्रणिक हिलींग ग्रुप मुरबाड चे स्वयंसेवक चंद्रकांत राऊत यांनी दिली आहे.
COMMENTS