मुरबाड (बाळासाहेब भालेराव) मुरबाड- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या प्रसिद्ध सरळगाव बाजारात पावसाळ्यात मिळणारी सर्वांची आवडती रानभा...
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) मुरबाड- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या प्रसिद्ध सरळगाव बाजारात पावसाळ्यात मिळणारी सर्वांची आवडती रानभाजी म्हणजे शेवली, चायवल दाखल झाल्याने ग्राहकांनी आपला डेरा या रानभाज्या कडे वळविला आहे
या रानभाजी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असून तसेच ही भाजी अतिशय सकस व रुचकर असल्याने ग्राहक या भाजीला मोठी पसंती देत आहेत त्यामुळे टोकावडे,धसई,शिवले,म्हसा,व मुरबाड या प्रमुख बाजारात रान भाज्यांना खूप मागणी आहे
अनेक आदिवासी महिला ही भाजी विकून पैसे मिळतात तसेच मुरबाडमध्ये दोन दिवस रिमझिम पाऊस पडत असल्याने व जूनच्या पहिल्याच आठवड्यात बाजारात शेवली व चायवल दाखल झाली आहे ही भाजी तयार करण्यासाठी बोडं ग्याचा पाळा सुद्धा सोबत ठेवतात सध्या शेवली ची वीस रुपयाला तीन जोड्या, तर चायवलच्या पंधरा रुपयाला तीन जोड्या अशा विकल्या जातात.
COMMENTS