शिरुर ( प्रतिनिधी ) - शिरूर शहर यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वृक्षदान व वृक्षरोपण करून वटपौर्णिमा साज...
शिरुर ( प्रतिनिधी ) -
शिरूर शहर यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त महिलांना वृक्षदान व वृक्षरोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
सध्या जगावर कोरोना संसर्गाचे संकट असून, प्राणवायू कमी पडल्याने अनेक महिलांना आपले जीव गमवावे लागले. त्याच प्रमाणे पुरूषांनाही जीव गमवावे लागले. वातावरणात प्राणवायू चे प्रमाण वाढावे नागरिकांना प्राणवायू मिळावा यासाठी महिलांना वृक्ष भेट देऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी विशेष मानला जातो. याच दिवशी सावित्रीने यमाच्या तावडीतून सत्यवानाला सोडवले होते.
तसेच आज कोरोना महामारीत प्राणवायूची किंमत सर्वांना कळली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून प्राणवायु ची कमतरता कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे नम्रता गवारी यांनी सांगितले.
वन अधिकारी सीमा सपकाळ,नयना परदेशी, सीमा लाड,रेणुका मलाव, पूजा इसवी,कल्पना सामंत,ज्योती गेजगे,पूर्वा सातपुते उपस्थित होते.
COMMENTS