मुरबाड ( प्रतिनिधी ) बाळासाहेब भालेराव कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील धबधब्यांवर मौजमजा ...
मुरबाड ( प्रतिनिधी ) बाळासाहेब भालेराव
कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील धबधब्यांवर मौजमजा करण्यासाठी येणा-या पर्यटकांवर या वर्षीही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ६ जून ते पुढील आदेशा पर्यंत राहाणार असल्याची माहीती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका लेखी आदेशाव्दारे दिली आहे.
कोरोना विषाणू मुळे पसरत असलेला हा आजार साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून शासनाने घोशीत केला आहे.ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या व म्रुत्यूदरही वाढीव असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने धबधबे,तलाव व धरणांवर मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे,पुणे आदिवासी ठिकाणाहून पर्यटक येत असतात .या ठिकाणी जिवित हानी होण्याच्या घटणाही अनेक घडल्या आहेत.या ठिकाणी येणा-या पर्यटकांमध्ये सामाजीक अंतर पाळणे शक्य नसल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधीत राहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होणू नये म्हणून माळशेज घाटातील सर्व धबधबे, सिध्दगड, डोंगरन्हावे, सोनावळे येथील गणपती लेणी , हरिश्चंद्रगड, बारवीधरण परीसर, पाडाळे डँम ,पळू ,खोपीवली, गोरखगड, सिंगापूर,नानेघाट, धसई डँम, व आंबेडेंबे या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बंदीमुळे अनेक कुटुंबाची उपासमार होणार! राज्य सरकारने आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून द्यावा!
माळशेज घाटातील निसर्ग अशा वातावरणात धबधब्यांबरोबरच तालुक्यातील ईतरही ठिकाणी ओलोचिंब होण्यासाठी शनिवारी, रविवार या सुटिच्या दिवसी हजारो पर्यटक येत असतात.या पर्यटकांमुळे छोटेमोठे व्यवसायही तेजीत चालत असतात, या परीसरातील शेकडो तरूण शेंगा, कणस,चहा असे अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करीत असतात, अनेक आदिवासी बांधव रानमेवा विकून आपलले पोट भरत असतात आता मात्र या बंदीमुळे अनेक कुटुंबाची उपासमार होणार आहे, त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या वर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तरी राज्य सरकारने आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.
COMMENTS