शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर ग्रामीण आरोग्य विभाग व करडे आरोग्य केंद्र यांच्या वतीने तरडोबावाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्येमाने कोर...
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर ग्रामीण आरोग्य विभाग व करडे आरोग्य केंद्र यांच्या वतीने तरडोबावाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्येमाने कोरोणा लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तर्डोबावाडी मधील २२१ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
शिरूर ग्रामीण आरोग्य विभाग व करडे आरोग्य केंद्र यांच्या वतीने तरडोबावाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्येमाने कोरोणा लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तर्डोबावाडी मधील २२१ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
या शिबिराचे व्यवस्थापन करण्यासाठी तर्डोबावाडी ग्रामपंचायत सरपंच धनश्री मोरे, उपसरपंच अपर्णा पाचर्णे, वर्षाताई काळे, तदनिका कर्डिले,महेंद्र पाचर्णे व सर्व सदस्य,ग्रामसेवक वैद्य खरीदी विक्री संघाचे संचालक संतोष मोरे, कर्मचारी व गावातील तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.जिजाऊ शिवशंभु सेनेचे तालुका अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी या लसीकरणासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्या असल्याचे संतोष मोरे यांनी सांगितले.
शिबिरामध्ये आरोग्य विभागाचे गोलेगाव उपकेंद्राचे डॉ. श्रद्धा आडवाने, भोसले पी. डी., तानसेन करपे,अनिका शिंदे,आशास्वायांसेवक दीपाली शिर्के,सुषमा पाचर्णे, यांनी लसीकरण नियोजन केले. व लसीकरण कार्यक्रम कोरोणाचे सर्व नियम पाळून यशस्वी पार पाडला.
COMMENTS