मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड सारख्या ग्रामीण भागात आज अनेक विद्दयार्थी असे आहेत की,ज्यांच्यात यश संपादन करण्याची जिद्द व बौध्दिकता आहे ...
मुरबाड (प्रतिनिधी) - मुरबाड सारख्या ग्रामीण भागात आज अनेक विद्दयार्थी असे आहेत की,ज्यांच्यात यश संपादन करण्याची जिद्द व बौध्दिकता आहे अशा विद्दयार्थ्यांना पुढिल वाटचाल ही सोपी व्हावी व मुरबाडचे भूमिपुत्र मुरबाड तालुक्याचे नावलौकिक करतील या दृष्टिकोणातून व विद्दयार्थ्यांची गरज लक्षात घेता जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोटीरामभाऊ पवार व त्यांचे संचालक मंडळ यांनी विविध नवीन अभ्यासक्रमांसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि येत्या 2021-22 वर्षापासून शांतारामभाऊ घोलप कला,विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्दयालय,शिवळे येथे 1) बी.कॉम अकाऊंट अॅण्ड फायनान्स प्रथम वर्ष विद्दयाशाखा,2)एम.एस्सी.आय.टी प्रथम विद्दयाशाखा,3)एम.कॉम.अॅडव्हान्स अकाऊंटन्सी प्रथम वर्ष दुसरी तुकडी,4)एम.एस्सी.ऑरगॅनिक केमिस्ट्री दुसरी तुकडी,5)तृतीय वर्ष बीएस्सी साठी स्पेशल गणित,6) तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची दुसरी तुकडी या नवीन अभ्यासक्रम महाविद्दयालयात सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.गोटीरामभाऊ पवार यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याने विद्दयार्थ्यांना नव्या उमेदेचे किरण दिसु लागले आहे.
मुरबाड तालुक्यातील विद्दयार्थ्यांना सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाडने उपलब्ध करून दिली आहे.विद्दयार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून अद्दयावत,नाविण्यपुर्ण,व्यवसाय व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याच्या महाविद्दयालयाच्या या प्रयत्नांना विद्दयार्थी सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS