शिक्रापूर (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येेथे भर रस्त्यात दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे.तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यावर द...
शिक्रापूर (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येेथे भर रस्त्यात दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे.तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यावर दगडाने ठेचून खून करण्यात आला असून सदर आरोपीला एक तासांच्या आतच शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.०५/०६/२०२१ रोजी दुपारी ०१:४५ च्या सुमारास तळेगाव ढमढेरे गावाच्या हद्दीत तळेगाव- न्हावरा रोडच्या बाजूस शासकीय गोडाऊन जवळ प्रतिभा दूध डेअरी समोर एक अनोळखी व्यक्तीने एका अनोळखी व्यक्तीने डोक्यावर व कपाळावर दगडाने मारून हत्या केल्याबाबतची फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा रजी ३९८/२०२१ भा.द.वी.क. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे राहुल धस,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग यांनी तात्काळ गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन हेमंत शेडगे पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना केलेल्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथके नेमण्यात आली. तपासाची चक्रे मोठ्या शिताफीने सदर इसमाचा खून दगडाने मारून खून केलेला आरोपी हरीश सुधाकर काळे ( वय २५ वर्ष ,रा. खंडोबाची आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) याला एक तासाच्या आत जेरबंद करण्यात आले. आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासात सदरचा गुन्हा त्याने सकृतदर्शनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून नवनाथ संपत चौधरी ( रा. पाबळ,ता.शिरुर, जि. पुणे) याचा दगडाने मारून खून केल्याचे निष्पन्न होत आहे.
सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक , मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,पुणे ग्रामीण, राहुल धस उपविभागीय पोलिस अधीक्षक दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत शेडगे पोलिस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन, विक्रम साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिवाराम खाडे, राजेश माळी व किरण भालेकर पोलीस उप निरीक्षक,पो.हवा. पंडित मांजरे जितेंद्र पानसरे,दत्तात्रय शिंदे,अजिनाथ शिंदे,पो.ना.अमोल चव्हाण, अमोल दांडगे,श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, पो. कॉ. महेंद्र पाटील, भरत कोळी, शिवाजी चिताळे, राहुल वाघमोडे, जयराज देवकर, लक्ष्मण शिरसकर यांनी मोठ्या शिताफीने केली.
अधिक तपास हेमंत शेडगे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश माळी पोलीस उपनिरीक्षक तळेगाव ढमढेरे दुरक्षेत्र हे करीत आहेत.
COMMENTS