खैरेवाडी ता. शिरुर येथील मयत मित्राच्या कुटुंबियांना मदत देताना माजी सभापती प्रकाश पवार, ग्रामस्थ व आदी. शिक्रापूर (प्रतिनिधी ) कोरोना म...
खैरेवाडी ता. शिरुर येथील मयत मित्राच्या कुटुंबियांना मदत देताना माजी सभापती प्रकाश पवार, ग्रामस्थ व आदी.
शिक्रापूर (प्रतिनिधी ) कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी अनेकांचे कुटुंब उद्वस्थ झालेले असून काही कुटुंबातील कुटुंब प्रमुख कोरोनाचे बळी ठरलेले असल्याच्या घटना घडल्या आहेत, अशाच प्रकारे शिरुर तालुक्यातील एका कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या पुढील उदरनिर्वाहासाठी त्याच्या मित्र परिवाराने चक्क एक लाख पस्तीस हजार रुपये गोळा करून कुटुंबियांना मदत केली आहे.
खैरेवाडी ता. शिरुर या शिरुर तालुक्यातील छोट्याशा गावातील काळूराम बापूसाहेब खैरे या इसमाचे कोरोना मुळे सहा मे रोजी निधन झाले, घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील कुटुंबीयांनी त्याच्यावर मोठे उपचार केले मात्र अपयश आले, काळूराम यांच्या मृत्यूनंतर त्याचे वृद्ध आई वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा उघडल्यावर पडले, काळूराम हा एकटा घरातील कर्ता पुरुष होता मात्र सध्या खैरे कुटुंबीयांवर मोठा मोठे संकट आले असल्याने काळूराम यांच्या मित्राने आपल्या मित्राच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेत तब्बल एक लाख पस्तीस हजार रुपये गोळा केले, त्यांनतर शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या उपस्थितीत गोळा केलेली रक्कम खैरे कुटुंबियांना देण्यात आली, यावेळी सरपंच स्वाती पवार, उपसरपंच व माजी सैनिक नंदकिशोर गोडसे, माजी सरपंच नवनाथ खैरे, रामदास मांदळे, फक्कड खैरे, चेअरमन दादासाहेब खैरे, पोलीस पाटील मंगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे, दिपक खैरे, माजी ग्रामपंचायत सदस्य केरबा मांदळे, प्रगतशील शेतकरी विजय पवार यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान सदर खैरे कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी जाहीर केले तर यावेळी मित्राच्या मदतीसाठी मित्रांनी केलेल्या कार्याने खैरे कुटुंबांसह अनेक जण गहिवरून गेले होते.
COMMENTS