शिक्रापूर ता. शिरुर येथे सुरु असलेले सोनार व्यसायीकांची दुकाने व दुकानात ग्राहकांना घेताना व्यवसायिक. शिक्रापूर ( प्रतिनिधी ) - शिक्राप...
शिक्रापूर ता. शिरुर येथे सुरु असलेले सोनार व्यसायीकांची दुकाने व दुकानात ग्राहकांना घेताना व्यवसायिक.
शिक्रापूर ( प्रतिनिधी ) - शिक्रापूर ता. शिरुर येथे सकाळी अकरा नंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या तसेच अत्यावश्यक सेवेतील नसणाऱ्या लहान लहान लघु उद्योगांवर व दुकानांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून सोनारांना सूट देत आमच्या गरिबांवर अन्याय का असा सवाल शिक्रापुरातील संतप्त व्यावसायिक करत आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे अत्यावश्यक सेवा वगळता आदी दुकाने सुरु ठेवणाऱ्या तसेच सकाळी अकरा नंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या दुकानदारांवर तसेच छुप्या पद्धतीने वस्तूंची विक्री करणाऱ्या अनेक दुकानदार व व्यवसायिकांवर पोलिसांकडून कारवाई करत दंड आकारत काही दुकानांवर गुन्हे दाखल केले जात आहे, सध्या दोन दिवसांपासून अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांना पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून ठराविक दुकानांवरच पोलिसांकडून कारवाई केली जात असून काही दुकानदार व व्यावसायिकांना दोन हजार, पाच हजार, दहा हजार रुपयांचा दंड पोलिसांनी आकारला आहे, मात्र मोठ्या व्यावसायिकांना सूट दिली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर पोलिसांकडून दुकान दारांवर चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कारवाई बाबत शिक्रापूर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, तलाठी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेत अन्याय न होऊ देण्याची मागणी केली मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशन समोरच अत्यावश्यक सेवेमध्ये नसलेल्या सोनारांच्या दुकानांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने गावातील अनेक व्यावसायिक संतप्त झाले असून या मोठ्या दुकानांना कोणाचे अभय मिळत आहे असा सवाल देखील व्यावसायिक करू लागले आहे.
पोलिसांनी फक्त गरिबांवर अन्याय करू नये - विनायक म्हेत्रे ( व्यवसायिक )
शिक्रापूर येथे पोलीस फक्त छोट्या छोट्या हातावर पोट असलेल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करत असून अनेक भाजीपाला विक्रेत्यांचे वजनकाटे उचलून घेऊन जात आहेत मात्र पोलिसांनी फक्त गरिबांवर अन्याय न करता सर्वांना समान न्याय द्यावा असे व्यवसायिक विनायक म्हेत्रे यांनी सांगितले.
सर्व सोनारांना दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे – अशोक शहाणे ( अध्यक्ष सराफ असोशियन )
शिक्रापूर येथील सोनारांची दुकाने सुरु असल्याबाबत तक्रारी आल्यानंतर मी लगेचच सर्व सोनार दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याबाबत सांगितले असल्याचे अध्यक्ष सराफ असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे यांनी सांगितले.
दुकाने सुरु असल्यास कठोर कारवाई - राजेश माळी ( पोलीस उपनिरीक्षक )
शिक्रापूर सह आजूबाजूच्या गावांमध्ये कोठेही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई तसेच वेळप्रसंगी गुन्हे देखील दाखल करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले.
COMMENTS