शिरूर ( प्रतिनिधी ) - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिरूर आंबेगाव मतदार संघांचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदार संघातील राजणगाव पोलिस स्टेशवर ...
शिरूर ( प्रतिनिधी ) - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिरूर आंबेगाव मतदार संघांचे आमदार आहेत. त्यांच्याच मतदार संघातील राजणगाव पोलिस स्टेशवर माजी सैनिकांचा आज मोर्चा आला.
राजणगाव येथे शनिवार दिनांक 26 जुन 2021 रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. माजी सैनिकांस अटक दिवसापूर्वी करण्यात आली होती. मात्र माजी सैनिकांस अटक करून त्यास बेडया व काळा बुरखा घालुन अपमान जनक वागणूक देण्यात आल्याने माजी सैनिक संतप्त होऊन सैनिकांनी पोलिस स्टेशवर निषेध मोर्चा काढण्यात आला.सदरील घटनेचा व्हिडीओ व्हायर झाल्याने माजी सैनिक संतप्त झाले होते. संतप्त माजी सैनिकांनी पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या मतदारसंघात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर त्रिदल माजी सैनिकांनी संघटनेचा ठिय्या आंदोलन, पोलीस प्रशासन व महावितरण विरोधात घोषणा दिल्या.
संपूर्ण घटना क्रम असा आहे की महावितरण कर्मचारी याला मारहाण केल्याबद्दल माजी सैनिक शामराव धुमाळ व त्यांच्या मुलांवर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल व त्यांना अपमानजनक वागणूक दिल्यामुळे त्रिदल माजी सैनिक संघटना आक्रमक होऊन रांजणगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. व माजी सैनिकाच्या पत्नी चा अपमान करणाऱ्या महावितरण कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अध्यक्ष संदिप लगड, एस के आठरे व माजी सैनिकांनी केली आहे.तसेच माजी सैनिकांला काळा बुरखा घालणाऱ्या पोलिस उप निरीक्षक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी बबन पवार शिरूर तालुका अध्यक्ष त्रिदल माजी सैनिक संघटना तशेच माजी सैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत.
COMMENTS