पुणे ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित संपूर्ण ...
पुणे ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित संपूर्ण पुणे शहरामध्ये वॉर्ड निहाय मोफत आरोग्य शिबीर डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे उदघाटन राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते पुणे काँग्रेस भवन येथे करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री विश्वाजीत कदम यांनी शहर युवक काँग्रेसचे कौतुक करताना म्हणाले कोरोनाच्या काळात आरोग्याच्यादृष्टीने अंत्यत उपयोगी असा उपक्रम पुणे शहर युवक काँग्रेस च्या वतीने राबत आहे. किरकोळ आजरा संबंधीच्या तक्रारी असताना नागरिक कोरोनाच्या धोक्यामुळे रुग्णालयामध्ये जाण्यास कोरोनाचा धोका असताना युवक काँग्रेसने पुणेकरांसाठी अतिशय आदर्श असा उपक्रम राबविला आहे.
रमेश बागवे म्हणाले डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविताना शहर युवक काँग्रेस व पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व सेलच्या माध्यमातून शहर युवक काँग्रेसच्या सोबत राहून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करू असे सांगितले. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,नगरसेवक अरविंद शिंदे,आबा बागुल,रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, मेहबूब नदाफ, बाळासाहेब अमराळे, साहिल केदारी, सुजित यादव, हृषीकेश बालगुडे, आशिष व्यवहारे, सौरभ अमराळे, समीर शेख, विवियान केदारी, करण चड्डा, निनाद अहलुवालिया, अल्तामश मोमीन, स्नेहल बांगर, परवेज तांबोळी, कुणाल काळे, निलेश सांगळे, वैष्णवी किराड, अदिती गायकवाड, सौरभ शिंदे, अक्षय परदेशी, शिवराज म्हात्रे, ओंकार मोरे, मंगेश निम्हण, धनराज माने व युवा पदाधिकारी उपस्थित होते.हा उपक्रम पुणे शहरातील 42 प्रभागामध्ये करण्यात येणार असून एका प्रभागामध्ये वॉर्डनिहाय आरोग्य शिबीर घेणार आहे. कोरोना काळात किरकोळ आजारी असणार्या सर्दी,खोकला,ताप,अस्वस्थ वाटणार्या नागरिकांची डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत संपूर्ण पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांची सर्वसाधारण तपासणी या शिबिरातून घेणार आहोत अशी माहिती पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके यांनी दिली.प्रास्ताविक विवेक कडू यांनी केले. आभार अभिजीत रोकडे यांनी मानले.
COMMENTS