खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्तानं विवीध कार्यक्रमांचे आयोजन ! तालुका कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांचा स्तुत्य उपक्रम ! ...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्तानं विवीध कार्यक्रमांचे आयोजन !
तालुका कार्याध्यक्ष अविनाश भोईर यांचा स्तुत्य उपक्रम !
मुरबाड (बाळासाहेब भालेराव) - संसदरत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस कडून सिडको चे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष भुवन गावचे सुपूञ अविनाश भोईर यांनी या वर्षा पासून एका आदिवासी मुलीला शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घ्यायचा मानस केला असून या वाढदिवसाचे औचित्य साधून सदूची वाडी खाटेघर येथील सिया दशरथ वाघ या इयत्ता 3रीत शिकणाऱ्या मुलीला शैक्षणिक वर्षा साठी दत्तक घेऊन दत्तक कार्याला सुरुवात केली यावेळी या मुलीला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतही देण्यात आली. त्याच प्रमाणे मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिपक वाघचौरे यांनी आपल्या सहकारी वर्गाच्या माध्यमातून मोफत पॅनकार्ड शिबीर आयोजित केले होते तर ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे पक्षाच्या वतीने फळ वाटप करण्यात येऊन रुग्णाची विचारपूस करण्यात आली तर तालुक्यातील किशोर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारीचे संकट पहाता आज साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याचे पक्षाचे पदाधिकारी जगन्नाथ गायकर यांनी सांगितले.
COMMENTS