मुरबाड (प्रतिनिधी) - १४ जुन २०२१ रोजी शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ना.यशोमती ठाकुर यांना तालुकाध्यक्ष च...
मुरबाड (प्रतिनिधी) - १४ जुन २०२१ रोजी शासकीय विश्रामगृह, ठाणे येथे राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ना.यशोमती ठाकुर यांना तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात व महिला जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेलार,महिला तालुकाघ्यक्ष संध्या कदम, तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे , शहरअध्यक्ष शुभांगी भराडे, तालुका संघटक अमोल चोरघे आदींच्या उपस्थितीत अर्ध्या ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणुन जबाबदारी घ्यावे असे निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीला संपुर्ण ठाणे जिल्हयाचे संपर्कमंत्री म्हणुन ना.अस्लम शेख हे असुन जिल्ह्याचा विस्तार पाहता ६ महानगरपालिका, २ नगरपरिषद, २ नगरपंचायत व ५ पंचायत समिती असा असुन १६ विधानसभा व ३ लोकसभा आहेत त्यामुळे संपुर्ण जिल्हाभर काम करणे हे कामव्याप्तीमुळे शक्य होत नाही आहे. ठाणे ग्रामीण तसेच कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानरगपालिका याठिकाणीची जबाबदारी जर कणखर नेतृत्व असलेल्या ना.यशोमती ठाकुर यांच्याकडे दिली तर स्थानिक विरोधक शिवसेना व भाजपा विरुध्द लढण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी मिळेल असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले. यावेळी चरख्यातुन कातलेली धागांची माळा व राष्ट्रमाता जिजाऊ मॅांसाहेब यांची प्रतिमा देवुन त्यांचे शिष्टमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी जबाबदारी दिल्यास संपर्कमंत्री पद घेवुन काम करेल असे आश्वासन ना.यशोमती ठाकुर यांनी उपस्थितांना दिले.
COMMENTS