मुरबाड (प्रतिनिधी) मुरबाड तालुक्यातील तमाम कष्टकरी शेतकरी गावकरी मजूर करी यांच्या गळ्यातील ताईत म्हणजेच रमेश हिंदुराव पाणी प्रश्न असो शेत...
मुरबाड (प्रतिनिधी) मुरबाड तालुक्यातील तमाम कष्टकरी शेतकरी गावकरी मजूर करी यांच्या गळ्यातील ताईत म्हणजेच रमेश हिंदुराव पाणी प्रश्न असो शेतकरी/ कामगारांचे प्रश्न असोत गोरगरिबांच्या प्रश्नांना नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून न्याय मिळवून देणारे नागरिकांच्या सुखसोयी साठी अनेकदा आंदोलने उपोषणे करून शासन - प्रशासनास जागे करणारे नाव म्हणजेच रमेश हिंदुराव.
रमेश हिंदूराव व कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 मार्च 2020 रोजी मजूर सहकारी संस्थांना रुपये तीन लाखाचा ऐवजी दहा लाखापर्यंत विना निविदा शासकीय कामे मिळावीत यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते या उपोषणाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , कामगार मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दखल घेतली असून महाराष्ट्रातील तमाम मजूर सहकारी संस्थांना दहा लाखापर्यंत विनानिविदा शासकीय कामे वाटप करण्याचा अध्यादेश नुकताच निर्गमित केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव व कॉम्रेड रमेश गायकवाड यांचे अभिनंदन होताना दिसून येत आहे
1) या उपोषणामध्ये शासकीय विकास कामे साधनसामग्री खरेदी यात पारदर्शीपणा आणण्यासाठी दहा लाखांच्या आतील कामे विनानिविदा वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे 2) 26 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयात बदल करण्यात यावा 3) मजूर सहकारी संस्थांना रुपये तीन लाख ऐवजी दहा लाखापर्यंत ची कामे मिळावीत
अशा विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, कॉम्रेड रमेश गायकवाड, अमोल तारमळे, सौ नलिनी चौधरी ,संजय कदम व मजूर कामगार संस्थेचे विविध पदाधिकारी यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले होते ते आश्वासन आज पूर्ण झाल्याने त्यांनी मंत्री महोदय यांचे आभार मानले आहेत.
रमेश हिंदुराव व कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी केलेले उपोषण हे फक्त ठाणे व पालघर जिल्हा पुरतेच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मजूर संस्थांसाठी असून त्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल घेऊन ठाणे जिल्हा मजूर मजूर कामगार संस्थेचे अध्यक्ष अमोल तारमळे यांनी पञाद्वारे रमेश हिंदुराव यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS