मुरबाड (प्रतिनिधी) - १९ जुन २०२१ रोजी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय खा.राहुलजी गांधी यांच्या जन्मदिनानिम्मित्ताने प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ...
मुरबाड (प्रतिनिधी) - १९ जुन २०२१ रोजी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय खा.राहुलजी गांधी यांच्या जन्मदिनानिम्मित्ताने प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रभर संकल्प दिन म्हणुन साजरा करण्यात आला. मुरबाड तालुक्यामध्ये “संकल्प दिन” तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला शहरअध्यक्ष शुभांगी भराडे, विचारमंचचे शहरअध्यक्ष गणेश खारे, अमोल सुरोशी, जयवंत पवार, अमोल चोरघे, सुधीर पवार, साईनाथ कंटे, स्वप्निल जाधव आदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सदरील उपक्रमात ब्लॅाक काँग्रेस कमिचीच्या वृक्षारोपण कार्यक्रम मौजे शिरगाव, पवाळे, आंबेळे बु या गावी करण्यात आले तर आशा वर्करांना मेडिकल किट वाटप ज्यामध्ये PPE किट, टेम्परेचर मशिन-१, थर्मामीटरू-२, ॲाक्सिमीटर - २, मल्टीव्हिटामिन - १० पॅकेट्स, पॅरासिटामल - १० पॅकेट्स, ओ आर एस - २६, सॅनिटायझर - ५, मास्क - १००, हॅंड ग्लोव्ह्ज - २५ जोड्या या गोष्टींचा समावेश असणार असुन शिरगाव, पवाळे, आंबेळे बु , मोहोप, डेहणोली यागावी करण्यात आहे. महिला काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढी विरुध्द मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन गजानन गॅस एजन्सी, गणेशनगरच्या समोर करण्यात आले तर युवक काँग्रेसच्यावतीने मोदी बेरोजगार मेळावा काँग्रेसभवन, मुरबाड येथे आयोजित करण्यात आला होता व यावेळी युवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
देशातील बेरोजगारी कमी करायची असेल, महागाई कमी करायची असेल, पर्यावरण व आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर येत्याकाळामध्ये खा.राहुलजी गांधी यांना सत्तेत आणावे लागेल असे मत यावेळी चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.
COMMENTS