मुरबाड (प्रतिनिधी) - कोरोना महामारीने सगळ्यांचचं जनजीवन विस्कळीत झालंय त्यात ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला तर अनेक समस्यांना तोंड...
मुरबाड (प्रतिनिधी) - कोरोना महामारीने सगळ्यांचचं जनजीवन विस्कळीत झालंय त्यात ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपण समाजाचे देणं लागतो आणि समाजातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणे ही स्व:ताची जबाबदारी तसेच कर्तव्य आहे या भावनेने फार कमी लोक काम करतात.ह्याचं सामजिक जाणिवेतून खाना चाहिये मिशन च्या माध्यमातुन मुरबाड तालुक्यातील मौजे निरगुडपाडा, साखरवाडी, फांगुळगव्हाण, मोरोशी, गणेशपुर, मोहवाडी येथील 800 गोरगरीब कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूच्या अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले तसेच शेतावर काम करताना पावसापासुन संरक्षण करण्यासाठी मेणकापड देण्यात आले. खासदार कपिलजी पाटील व आमदार किसनजी कथोरे यांच्या प्रेरणेने सौ.सिमा घरत व अनिल घरत यांच्या वतीने अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती नंदा उघडा, पंचायत समिती सदस्या जया वाख,खाना चाहिये मिशनचे स्वराज शेट्टी, शशी शेट्टी, संजीव बगारीया, तरुण नगडा, मयंक बिहानी, तुषार कामत, रमेश उघडा, बुधाजी पारधी, लाड्यादादा मेंगाळ, चंदर भला,राजेश भले, मोहन देशमुख,रमेश वाख, दाऊदभाई, सुदाम भला, भास्कर भला, प्रकाश खाकर, कांताराम भला, विनायक मधे व सर्व महिला भगिनींनी विशेष सहकार्य केले.
COMMENTS