माळशेज घाटात इको स्पोर्ट या चारचाकी वर दगड कोसळली..! मुरबाड (प्रतिनिधी) सद्या पावसाने मुरबाड तालुक्यात चांगली हजेरी लावली आहे. संततधार...
माळशेज घाटात इको स्पोर्ट या
चारचाकी वर दगड कोसळली..!
मुरबाड (प्रतिनिधी) सद्या पावसाने मुरबाड तालुक्यात चांगली हजेरी लावली आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून माळशेज घाटात आज एका चारचाकी वाहनावर मोठी थंब पॉईंट जवळची दगड कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पावसाळा सुरू होताच माळशेज घाटातील दरड कोसळन्याच्या घटनेने सुरुवात केली असून शुक्रवारी ११ जून रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कल्याण-मुरबाड- नगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात उभ्या असलेल्या एका चारचाकी कारवर अचानक थम पॉईंट जवळची दगड कोसळली.
आज संध्याकाळी ही कार नगर हुन कल्याणच्या दिशेने जात असतांना माळशेज घाटात बोगद्याच्या अलीकडे हा अपघात झाला . दुर्घटनाग्रस्त कारमधील दोन प्रवासी मित्रांनी चहा पिण्यासाठी कार रस्त्याकडेला पार्क केली होती. ते चहाच्या हॉटेलात पोहचताच कारवर अचानक थंम पॉईंट जवळची दगड कोसळली. चहा घेण्यासाठी ते गाडीतून उतल्याने ते दोघेही बालंबाल बचावल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ही कार रत्नाकर माचवे (अहमदनगर) यांच्या मालकीची असून ते पार्किंग करून उतरल्याने बचावले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस, टोकावडे पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक सुभाष खरमाटे यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन घाग व पोलिस कर्मचारी आणि घटनास्थळी येऊन तात्काळ यांचे मदतकार्य चालू केले. अपघाता नंतर तात्काळ हा घाटरस्ता चालू करण्यात आला आहे. आताही माळशेज घाट सुरळीतपणे सुरू आहे अशी माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान सद्यस्थितीत घाटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके पसरलेले आहे. त्या मुळे वाहनचालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही वाहन चालकाने आपले वाहन चालवताना घाटात धुके किती आहे याचा अंदाज घेऊन वाहन चालवावे असे आव्हान टोकावडे पोलिसांनी केले आहे.
COMMENTS