मुरबाड (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात पून्हा एप्रिल महिन्यात लाॕकडाऊन घोषित झाला. त्यामुळे प्रवाशी वाहतुक बंद करण्...
मुरबाड (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात पून्हा एप्रिल महिन्यात लाॕकडाऊन घोषित झाला. त्यामुळे प्रवाशी वाहतुक बंद करण्यात आली होती. आता कोरानाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना सरकारने अनलाॕक घोषित करुन बरेचसे व्यवसाय , व्यापार , बाजारपेठा सूरु करण्यास परवानगी दिली असली तरी मुरबाड तालुक्यातील ग्रामिण भागातील नागरिकांची लाईफलाईन असलेली बस सुविधा माञ रेंगाळताना दिसत आहे. ग्रामिण भागातून दररोज मुंबई , ठाणे , कल्याण , नविमुंबई अशा ठिकाणी नोकरी निमित्त चाकरमानी जात असतात तसेच मुरबाड औदोगिक क्षेत्रात रोजगारासाठी अनेक लोक एस. टीने येत असतात. पंरतु मुरबाड आगारामधुन अजूनही ग्रामिण भागातील बस फेऱ्या सुरू नसल्याने चाकरमानी , आजारी पेशंट , महसूल , पंचायत समिती मधिल कामे तसेच शेतीचा खरिप हंगामासाठी लागणारे खते, बि- बियाणे , किटकनाशके , औजारे महत्त्वाची असल्याने त्यांना तालुक्याला येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मिळेल त्या वाहनातून प्रवास करावा लागतो. शेतीचा महत्त्वाचा हंगाम सूरु होत असताना एस. टी.ची लालपरी धावत नसल्याने शेतकरी , कष्टकरी , आजारी माणसांची मोठी अडचण निर्माण होत आहे. दरम्यान मुरबाड बस आगाराचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता इंधन तुटवडा असल्याने सर्व मार्गावरील फे-या एकदम सूरु करता येणार नसल्याने मुरबाड - मोधळवाडी , मुरबाड - नारिवली या मार्गावरील सकाळ संध्याकाळच्या बसफेर्या सूरु करण्यात आल्या असून टप्प्या - टप्प्याने ईतर ठिकाणच्या फेर्या सूरु करणार असल्याचे आगार प्रमुख सूर्यवंशी यांनी सांगितले.
सध्या शेतीचा महत्त्वाचा खरीप हंगाम सूरु होणार आहे पाऊसही वेळेवर चांगल्या प्रकारे सूरु झाला असल्याने शेतकऱ्यांना खते , बियाणे, घरात लागणारे किराणा आणावे लागते बस सुविधा नसल्याने खाजगी वाहनातून आणावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. -
रमेश हिंदुराव ,
सामाजिक कार्यकर्ते .
COMMENTS