कोरेगाव भीमा (प्रतिनिधी )शंकर पाबळे लोणीकंद परिसरातील हम रस्त्यावर जबरी चोरीकरून पसार झालेल्या टोळीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्य...
कोरेगाव भीमा (प्रतिनिधी )शंकर पाबळे
लोणीकंद परिसरातील हम रस्त्यावर जबरी चोरीकरून पसार झालेल्या टोळीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
इशाप्पा उर्फ विशाल जगनाथ पंदी (वय 19), प्रदिल उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय 23), ओंकार शंकर गुंजाळ (वय 24), गणेश रामदास काळे (वय 32), विजय नंदू राठोड (वय 22) अशी अटक केलेल्या टोळीचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार यातील फिर्यादी हे येथील हम रस्त्यावरून जात असताना त्यांना अडवून मारहाण करत साडे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. यावेळी युनिट सहाच्या पथकाला हा गुन्हा सराईत गुन्हेगार इशाप्पा याने गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला केसनंद फाटा परिसरात सापळा रचून अटक केली. त्यानंतर प्रदीप याला पकडले. त्यांना या गुन्ह्यात अटक करून त्याची माहिती घेतली असता हा गुन्हा इतर तीन साथीदार यांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार या तिघांना सापळा रचून अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यातील इशप्पा व ओंकार गुंजाळ हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक पाटील, कर्मचारी तऋषीकेस ताकवणे, ऋषीकेस व्यवहारे, ऋषीकेस टिळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे
COMMENTS