शिरूर (प्रतिनिधी) - येथील ग्रामपंचायत तरडोबाची वाडी येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर संप्पन्न झाले. या शिबिरामध्ये दोनशे मुलांची आर...
शिरूर (प्रतिनिधी) - येथील ग्रामपंचायत तरडोबाची वाडी येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबीर संप्पन्न झाले. या शिबिरामध्ये दोनशे मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याचे सरपंच सौ धनश्री संतोष मोरे यांनी सांगितले.ग्रामपंचायत तरडोबाची वाडी व हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या कोरोना महामारीचे सावट सगळीकडे पसरले असूण संभाव्य तिसरी लाटेची शक्यता असल्याने हि लाट लहान मुलांना धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर लाटेपासून लहान मुलांना बचावासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे.
यासाठी शिरूर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथे लहान मुलांचे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील एक ते पाच वयोगटातील मुला मुलींचे तज्ञ डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, वजन. उंच्ची,कॅल्शियम, हाडांची तपासणी करण्यात आली.ज्या मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. त्यांना मास्क,गोळ्या,टॉनिक व खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच मुलांच्या वाढत्या वयानुसार वजन व उंच्ची योग्य प्रमाणे वाढ होते कि नाही याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. तशेच दोन कोरोना ग्रस्त गरीब कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांना अन्न धान्य देण्यात आले असल्याचे डॉक्टर संध्या गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी डॉ संध्या गायकवाड, सुवर्णा अरबूज,डॉ शीतल भोर, डॉ अनघा देशमुख, सोनल कस्तुरे, ओंकार कांबळे, प्रमोद कंगारे, अविनाश शिंदे, लक्ष्मण कांबळे, स्नेहा कांबळे, सुमन शेळके, जयश्री क्षीरसागर, सविता जगदाळे, कल्पेश जगताप सरपंच धनश्री संतोष मोरे, उपसरपंच अपर्णा विनायक पाचर्णे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामशेवक नंदकुमार वैद्य व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS