शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायतीवर काही ग्रामपंचायतीवर नविन तर काही ग्रामपंचा...
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायतीवर काही ग्रामपंचायतीवर नविन तर काही ग्रामपंचायतीवर जुन्याच गटांनी बाजी मारली असेच उरळगाव ग्रामपंचायतीवर मागील कारभाऱ्यांची सत्ता संपुष्टात आली व नविन कारभाऱ्यांच्या हाती सत्ता आली. परंतु मागील पंचवार्षिक मध्ये 2015 ते 2020 या काळात ज्यांची सत्ता होती. त्यांनी ग्रामपंचायती मध्ये अनागोंदी कारभार केल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सुद्धा समजते.
या गावात साधी चहाची टपरी सुद्धा नाही. तरी सुद्धा ग्रामपंचायत मिटिंगचा चहापाणी खर्च चक्क 83026रु. येवढा लावला आहे. ग्रामपंचायत शिपाई ड्रेस खरीदी 29426रु. लावला आहे. असे अनेक आवाढव्य खर्च कार्यालयीन नोंदवहीत मध्ये लावण्यात आले आहेत.यामुळे उरळगाव ग्रामपंचायतिचे 2015 ते2020चे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रवाशी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केली आहे.
COMMENTS