शिरूर ( प्रतिनिधी ) - तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ७०९ मधील गायरान जमिनीचे तात्काळ मोजणी करून हद्द निश्चित करण्याची मा...
शिरूर ( प्रतिनिधी ) - तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ७०९ मधील गायरान जमिनीचे तात्काळ मोजणी करून हद्द निश्चित करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच अनिल लक्ष्मण नवले यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे केली.
त्यांनी सांगितले कि गट नंबर ६९८ मध्ये प्लॉटिंग पाडून विक्री केली मात्र प्रत्यक्षात ताबा देताना गायरान जमीन गट नंबर ७०९ चा ताबा दिला असल्याचे दिसत आहे. यासाठी मी गायरान जमिनीची मोजणी करून सीमा निश्चित करावी अशी मागणी वारंवार करत आहे. आत्तापर्यंत चार वेळा मोजणी आली मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्या नावाचा वापर करून स्थानिक राजकारणी मोजणी अधिकाऱ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप अनिल नवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी या प्रकरणात लक्ष घालून सरकारी गायरान जमिनीची मोजणी करून फसवणूक झालेल्याना न्याय देन्यात पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कारेगाव ग्रामपंचायत हद्दीत वाढती लोकसंख्या पहाता कारेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत गरज आहे. या सरकारी गायरान जमिनीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केल्यास नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.मी सरपंच असताना गावच्या विकासासाठी प्राधान्याने लक्ष दिले होते व या पुढेही देतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले नाही आणी यापुढेही घालणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अनेक दिवसांपासून कारेगाव हद्दीतील सरकारी मालमत्ता असलेल्या जागेचा विषय सध्या चांगलाच तापला आहे. मुळात काही स्थानिकांनी इतर जागेचे खरेदीखत दाखवत प्रत्यक्षात गट क्रमांक ७०९ सरकारी गटात गुंठेवारी करून विक्री चालू केल्याची घटना घडत असल्याचे चित्र समोर येत आहे. विक्री करताना खरेदीदारांना दुसऱ्या गटाचे खरेदी खत करून दिले जाते व जागा ताब्यात देताना गायरान गट नं. ७०९ मधील जागा ताब्यात दिली जाते.या सर्व घडामोडींमुळे कुठेतरी ग्रामपंचायत यांची फसवणूक होत आहे व सरकारी जागेत अतिक्रमण होत असल्याने पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष मा.सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.
त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, प्रविणजी दरेकर, विरोधीपक्ष नेते विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, गिरीशजी वापट साहेब, खासदार, पुणे, अशोकवापू पवार, आमदार शिरूर- हवेली विधानसभा,तसेच शिरुरचे तहसीलदार लैला शेख यांच्याशी पत्रव्यवहार करून योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.तसेच येत्या 14 जुलै पर्यंत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर 15 जुलै ला आमरण उपोषणाचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
COMMENTS