शिरूर (प्रतिनिधी) - गोलेगाव ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तीनशे मुलांची मोफत आरोग्य ...
शिरूर (प्रतिनिधी) - गोलेगाव ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तीनशे मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. गोलेगाव ग्रामपंचायत व हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे गोलेगाव ग्रामपंचायत सरपंच दिलीप पडवळ यांनी सांगितले
सध्या कोरोना महामारीने सगळीकडे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.संभाव्य तिसरी लाटेची शक्यता वर्तविली जात आहे हि लाट लहान मुलांना धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत गोलेगाव यांनी लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत सुमारे तीनशे मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजक हिराबाई कावासजी जहांगीर मेडिकल रिसर्च सेंटर पुणे यांचे विशेष कौतुक जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी केले.
या शिबिरामध्ये शहरातील 0 ते १८ वयोगटातील मुला मुलींचे तज्ञ डॉक्टरांकडून हिमोग्लोबिन, वजन. उंच्ची,कॅल्शियम, हाडांची तपासणी करून एक्सरे काढण्यात आले.शिबिरामध्ये मुलांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले असुन सहभागी मुलांना मास्क व खाऊ देण्यात आला असल्याचे उपसरपंच प्रतिभा वाखारे यांनी सांगितले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मुलांच्या वाढत्या वयानुसार वजन व उंच्ची योग्य प्रमाणे वाढ होते कि नाही याची मोफत तपासणी करण्यात येते व त्यांना मोफत औषधे दिले जात असल्याचे डॉक्टर संध्या गायकवाड यांनी सांगितले.
या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले .यावेळी सरपंच दिलीप पडवळ, उपसरपंच प्रतिभा वाखारे, सुनीता पडवळ,मुख्याध्यापक संदीप आढाव,संध्या गायकवाड, सुवर्णा अरबूज, डॉ चिरंतक ओझा,अनघा देशमुख, गौरी घोट, मुक्ता देशपांडे,सोनल कस्तुरे,ओंकार कांबळे, प्रमोद कंगारे, अविनाश शिंदे, लक्ष्मण कांबळे, स्नेहा कांबळे, सुमन शेळके, जयश्री क्षीरसागर, सविता जगदाळे, कल्पेश जगताप आरोग्यसेवक टि ई करपे, आरोग्य सेविका पी डी भोसले आदी उपस्थित होते.
COMMENTS