शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना वैश्वीक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असुन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे...
शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना वैश्वीक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असुन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टीकोनातुन शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत उपबाजार पिंपळे जगताप येथील रक्तदान यशस्वी शिबिरानंतर शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिती, शिरूर व्यापारी असोसिएशन व हमाल पंचायत शिरूर यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज मुख्यबाजार शिरूर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबिरास शिरूर शहर, भुसार मार्केट, कांदा मार्केट, शेतकरी बाजार मधील शेतकरी, व्यापारी, हमाल, इतर सर्व बाजार घटक तसेच नागरीक यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन १६६ जनांनी रक्तदान केले.
यावेळी शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापु पवार, शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाशशेठ धारीवाल, पोलिस निरीक्षक खानापुरे साहेब, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रविबापु काळे, दादाभाऊ वाखारे, सभापती शंकरदादा जांभळकर, उपसभापती विकासआबा शिवले, माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, संचालक विजेंद्र गद्रे, सतिष कोळपे व रक्तदाते उपस्थित होते. रक्तदान शिबिर आयोजित करणेसाठी संचालक प्रविनशेठ चोरडीया, बंडुशेठ जाधव, सचिव अनिल ढोकले तसेच दिलीपशेठ कोठारी यांनी विशेष सहकार्य केले.
श्री.भरतशेठ चोरडीया यांनी ६५ वे तर संचालक प्रविणशेठ चोरडीया यांनी ५१ वे रक्तदान केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांचे हस्ते विषेश सन्मान करण्यात आला.
COMMENTS