शिरूर ( प्रतिनिधी ) - खाजगी शाळा शासन आदेशास के राची टोपली धाकवत सक्तीने फि वसुली करत आहेत. याविरोधात अनेकवेळा आंदोलन केले. तशेच उपोषण कर...
शिरूर ( प्रतिनिधी ) - खाजगी शाळा शासन आदेशास के राची टोपली धाकवत सक्तीने फि वसुली करत आहेत. याविरोधात अनेकवेळा आंदोलन केले. तशेच उपोषण करण्याचा इशारा देऊनही मागणीची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाने दखल घेतली नाही तर दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी तहसीलदार कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा शिरूर पालक संघटनेचे अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दिनांक २५ जुन २०२१ रोजी तहसीलदार लैला शेख यांना निवेदन दिले आहे.
निवेदनत म्हटले आहे कि गेल्या मार्च २०२० पासून कोरोना महामारिमुळें सर्व उद्योग,व्यवसाय बंद आहेत. अनेक लोकं बेरोजगार झाले. कोरोनामुळे शाळा कॉलेज सुध्दा बंद आहेत. अश्या आर्थिक संकटात समाज असताना शिरूर शहरातील खाजगी विनाअनुदानित शाळा यांनी मात्र सर्रासपणे फी वसुली चालू ठेवली. या काळात शिक्षण फक्त ऑनलाईन पद्धतीने घेतले जात असल्याने शाळांनी संपूर्ण फी घेण्यासाठी पालकांना वेठीस धरू नये व मुलांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये असे शासन आदेश असताना सुध्दा या सर्व खाजगी शाळांनी मात्र या आदेशाना केराची टोपली दाखवली म्हणून या विरोधात पालक संघटना शिरूर गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासनास बरोबर घेऊन संघर्ष करत आहे असे नाथाभाऊ पाचर्णे यांनी सांगितले.
परंतु सर्व शाळा या राजकीय नेते पुढारी व व्यावसायिक लोकांच्या आसल्याने अनेक निवेदन शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकारी,तहसीलदार,पंचायत समिती यांना देऊनही प्रशासनाने यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.प्रशासनाच्या या निरुत्साही समाजहितविरोधी भूमिका दिसत असल्याने गेल्या महिन्यात ३ जून २०२१ ला पालक संघटनेने उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला. परंतु कोरोना लॉकडाऊन चे कारण दाखवून प्रशासनाने परवानगी नाकारली व मध्यस्थी करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. परंतु गेल्या २५ दिवसात एकही बैठक घेतली नाही व सर्व जनतेची दिशाभूल करून वेळकाढूपणा केला आणि याचा फायदा या शाळांनी फी वसुली करून घेण्यासाठी सुरू केला.
पालक संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे,
१) शिरूर शहरातील सर्व खाजगी शाळांनी २०१९ वर्ष प्रमाणेच फी आकारणी करून ट्युशन फी मध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी व ट्युशन फी व्यतिरिक्त कोणतेही शुल्क घेऊ नये.
२) मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा २००९ (RTE) अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असताना जमा केलेले शुल्क तत्काळ परत करावेत.
३) ज्या मुलांना फी अभावी शिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांना तत्काळ शिक्षण सुरू करावे.
४) २०२० या वर्षात शाळांनी अतिरिक्त जमा केलेले शुल्क पालकांना तत्काळ परत करावेत.
तरी प्रशासनाने या मागण्यांवर तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा नाईलाजास्तव मी दिनांक ०१ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता तहसीलदार शिरूर यांच्या कार्यालय आवारात आत्मदहन करणार आहे याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असे नाथाभाऊ पाचर्णे यांनी निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS