शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. शिरूर शहरात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाने बाधीतांची संख्या दिव...
शिरूर ( प्रतिनिधी ) - सध्या सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. शिरूर शहरात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाने बाधीतांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे .
कोरोनावर मात करण्यासाठी शिरूर नगर परिषद प्रशासनाचे त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत बाधीतांचा आकडा मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत होते.सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन बेड मिळत नव्हते. त्यातच मोठया प्रमाणात ऑक्सीजनचा तुटवडा भासत होता.
ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागाला होता.यावेळी शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी शहरातील कोरोना परिस्थिती जाणुन घेत त्या विषयी काय उपाय योजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले की,प्रशासनाने ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्यास मी शिरुर वाशीयांसाठी स्वखर्चाने पुरवठा करण्यास तयार आहे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत. शिरूर शहरातील नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणारे शिक्षण समितीचे माजी सभापती संतोष शितोळे व तुकाराम खोले हे दोन संताजी,धनाजी या जोडीने 'ऑक्सिजन दूत'बनले. परंतु हा प्रवास सोपा नव्हता यासाठी घरून परवानगी मिळणे गरजेचे होते.संतोष शितोळे यांनी या कार्याची माहिती घरी त्यांच्या पत्नी नगरसेविका सुरेखा शितोळे यांना सांगितली.त्यांनी सुद्धा या कार्यासाठी परवानगी दिली. तसेच तुकाराम खोले यांनी सुद्धा घरच्यांची परवानगी घेऊन या कार्यास सुरुवात केली. कोणत्याही यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो. आम्हांला घरातुन मिळालेल्या खंबीर पाठीब्यांमुळे ऊर्जा मिळत असल्याची भावना संतोष शितोळे यांनी सांगीतले. तसेच या कार्यात डॉ. संदीप परदेशी यांचीही मोलाची साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तुकाराम खोले यांनी सांगितले की कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण झालं आहे. लोकं भयभीत झाले आहेत.त्या मध्ये भर म्हणजे ऑक्सिजन बेड कमी पडू लागले
त्यामुळे काहींना प्राण गमवावे लागत होते.काय करावं काही सुचत नव्हते यातच धारिवाल यांचे वाक्य माझ्या डोक्यात भिनले की स्वखर्चाने ऑक्सिजन पुरवठा करणार यावेळी प्रकाशभाऊ धारिवाल यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी सभागृह नेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी सांगितले की तुम्ही तुमचे ऑक्सिजनचे कार्य सुरु करा मी तुमच्या पाठीशी आहे. यासाठी जो काही खर्च होईल तो संपूर्ण खर्च मी करेन, आतापर्यंत जवळपास शंभर जणांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात आले आहे.
तसेच या ऑक्सिजन सेवेत शिरूर शहरातील दादाभाऊ लोखंडे, तडफदार तरुण विशाल उर्फ बंटी जोगदंड,सागर पांढरकामेे, साजिद खान हे महत्वाचे काम बजावत असल्याचे खोले यांनी सांगितले. ऑक्सिजनचे भरलेले वजनदार सिलेंडर कोरोना रुग्ण ज्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. तेथे पोहचवणे व नंतर परत घेऊन येणे हे जिकीरीचे काम बंटी जोगदंड व त्यांचे सहकारी न थकता करत आहेत. त्यांची ही सेवा कौतुकास्पद आहे. त्याच बरोबर शिरूर शहरात गरज लागेल तिथे ऑक्सिजन सिलेंडर मोफत मिळेल असे संतोष शितोळे यांनी सांगितले.
'मानव सेवा हिच ईश्वर सेवा' या वाक्यप्रमाणे संतोष शितोळे व तुकाराम खोले हे दोन मित्र म्हणजेच संताजी धनाजी जोडी सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या पाठबळाने शिरूरचे खरे 'ऑक्सिजन दूत'ठरत आहेत.
शिरूर शहरात आम्ही विना विलंब सेवा देण्यास तत्पर असुन ज्यांना कोणाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज लागेल त्यांनी खालील व्यक्तींना संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
संतोष शितोळे :-9028176760
तुकाराम खोले :-7499711945
विशाल उर्फ बंटी जोगदंड :-8308786882
COMMENTS