श्रीगोंदा प्रतिनिधी (शकिलभाई शेख ) - मांडवगण परिसरातून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त .श्रीग...
श्रीगोंदा प्रतिनिधी (शकिलभाई शेख ) -
मांडवगण परिसरातून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त .श्रीगोंदा पोलिसांची कारवाई .रामदास रायकर या आरोपीस पोलिसांनी केली अटक .
तालुक्यातील मांडवगण कात्राबाद येथे गट नंबर 456 ऑब्लिक 2 मध्ये रामदास गेणु रायकर या शेतकऱ्याने आपल्या शेतात विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाचे झाडांची लागवड केलेली असल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना बरोबर घेऊन सदर शेतात छापा मारला असता त्यांना गट नंबर 456 ऑब्लिक दोन मध्ये रामदास गेनू रायकर या ने नशेच्या विक्रीसाठी
लागवड केलेली गांजाची 110 झाडेमिळून आल्यानेपंचांसमक्ष पंचनामा करून एन डी पी एस ॲक्ट1885 कलम 20 ( क) ( ख ) ( १ ) . प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे .केंद्र शासनाने ही नशाकारक गांजाची झाडाची लागवड करण्यास प्रतिबंध केला असल्याचे माहित असूनही रायकर याने आपल्या शेतात
झाडांची लागवड केली होती. झाडाची संख्या110 असून यांचे वजन 54 किलो असल्याची माहिती पोलिसांनी दिली व त्याची किंमत पाच लाख चाळीस हजार रुपये होत असल्याचे सांगितले या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे .उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर पो. हे काँ अंकुश ढवळे ,
पो .कॉ .प्रकाश मांडगे दादा टाके ,किरण बोराडे , गोकुळ इंगवले , प्रकाश दंदाडे आदींनी ही कारवाई केली .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करीत आहेत.
COMMENTS