शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर येथील सामाजीक कार्यकर्ते आमित शिर्के यांची आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या शिरूर तालुका युवक आघा...
शिरूर ( प्रतिनिधी ) - शिरूर येथील सामाजीक कार्यकर्ते आमित शिर्के यांची आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या शिरूर तालुका युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी बिन विरोध निवड करण्यात आली. युवक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मयुर भाऊ कुंभार यांनी निवडीचे पत्र अमित शिर्के यांना दिले.
अमित शिर्के हे राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे शिरूर शहर कार्याध्यक्ष म्हणुन काम करत आहेत. युवकांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती,त्यांनी केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात आल्याचे युवक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मयुर कुंभार यांनी सांगीतले.ते म्हणाले की, शिर्के यांच्या कार्यकाळात शिरुर तालुक्यातील कुंभार समाजातील युवकांचे प्रश्न मार्गी लागातील व पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका आदर्शवत ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
अमित शिर्के म्हणाले की, कुंभार समाजातील युवकांना बरोबर घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युवकांसाठी अनेक उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
अमित शिर्के यांच्या निवडीनंतर शिरूर हवेली चे आमदार अशोक बापु पवार, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक मोहनरावजी जगदाळे, माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय डाळजकर,प्रदेश अध्यक्ष शामशेठ राजे, प्रदेश कार्यध्यक्ष संतोषजी पाषाणकर, प्रदेश उपाध्यक्ष किसन काळे, प्रदेश संघटक प्रकाश कुंभार,जिल्हाध्यक्ष नथुशेठ पिरगुंटकर कुंभार,पुणे जिल्हा सचिव भगवान श्रीमंदिलकर,पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश कुंभार,युवक प्रदेश अध्यक्ष शरद दरेकर, युवक प्रदेश उपाध्यक्ष व्यंकट गोरगीले,आदींनी अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या.
तसेच शिरूर तालुक्यातुन बाळासाहेब जामदार, शिरूर ग्रामिण चे माजी सरपंच रामभाऊ जामदार, दत्ताशेठ काळे, शशीकांत शिर्के, विजय शिर्के,संदिप मंदिलकर, संदिप जामदार, अमोल गोरे, नितीन जामदार,संतोष जामदार यांच्यासह तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS