अंजिक्य वारे यांच्या जागतीक विक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन येथे नोंद शिरूर (प्रतिनिधी) किरण चौधरी - कोरोनाने जगात हाहाक...
अंजिक्य वारे यांच्या जागतीक विक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन येथे नोंद
शिरूर (प्रतिनिधी) किरण चौधरी -
कोरोनाने जगात हाहाकार माजवला असतानाच त्याचा सामना करण्यासाठी अनेक देशात अटोकात प्रयत्न केले जात होते. कोरोना या महामारीच्या झळा भारताला सुद्धा बसला.या जागतिक वैश्विक महामारीमुळे २०२० मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले, त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर झाला. अनेकांचे रोजगार गेले तर उद्योधंदे अडचणीत सापडून बंद पडले. त्याचा परिणाम म्हणजे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली.
अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेक तरुण बेरोजगार झाले.यातच नवोदित तरुणांना (फ्रेशर्स विद्यार्थी) यांचा मोठा प्रश्न उभा राहिला त्यांना नोकरीच्या संधी भेटेना यातच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आपल्या मूळ गावी परत गेले.
वरील सर्व परिस्तिथी पाहता आस्थापनांना उत्पादन करण्याकरता मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली,
Haier Appliance India Pvt Ltd आस्थापनेत , Human Resource विभागातील अजिंक्य वारे यांनी महाराष्ट्रातील नवोदित तरुणांना (फ्रेशर्स विद्यार्थी) यांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करुण देत असतानाच अस्तापनाची मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा या मध्ये योग्य प्रकारे सांगड घालत
लॉकडाऊन काळात सर्वाधिक ३०७४ फ्रेशर तरुणांना नोकरीची संधी दिली.ते मागील तीन वर्षापासुन कार्यरत आहेत.हा एक जागतीक विक्रमच शिरूर येथील अंजिक्य वारे यांनी केला. या जागतिक विक्रमाची दखल लंडन येथे घेण्यात आली. या जागतीक विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन येथे झाली . तसे प्रमाणपत्र अजिंक्य वारे याना देण्यात आले. सर्वत्र अजिंक्य वारे यांचे कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Nayna Job dile Tyna 6 month ne break dile,te pn without Experience letter ne
ReplyDelete