टाकळीमियात गावपुढाऱ्यांचा उतावीळपणा सामान्य नागरिक मात्र हैराण राहुरी टाकळीमिया (अक्षय करपे) - टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्र टाक...
टाकळीमियात गावपुढाऱ्यांचा उतावीळपणा सामान्य नागरिक मात्र हैराण
राहुरी टाकळीमिया (अक्षय करपे) -
टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीमिया कोविड 19 लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे मात्र टाकळीमिया येथील काही अतिउत्साही गावपुढारी जिथे गरज नाही तिथे नाक खुपसत असतात
टाकळीमिया प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचा कार्यक्रम चालू असताना काही गावपुढारी आपले नातेवाईक तसेच आपल्या मर्जीतल्या लोकांना अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा गैरवापर करत आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना सांगतात ही आमची मानसे आहे यांना आधी लस द्या
सकाळपासून सामान्य नागरिक लस.घेण्यासाठी ताटकळत उभे राहतात आणि हे काही अतिउत्साही गावपुढारी आपल्या मर्जीतल्या लोकांना पुढे नेऊन लस देऊन आणतात आणि सामान्य माणूस तसाच ताटकळत उभा राहतो आणि काही वेळाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स सांगतात बाबांनो आता लस संपली आहे उद्या या बाबा गेले कोमात आणि गावपुढारी जोमात
उपसरपंच सुभाष जुंदरे तसेच पोलीस पाटील नामदेव जगधने हे सामान्य नागरिकांना लस देण्यासाठी पुढाकार घेत असताना टाकळीमियातील काही अतिउत्साही तसेच येथे गरज नाही तिथे नाक खुपसणारी राजकीय मंडळी लसीकरण कार्यक्रमात बाधा आणत आहे त्यामुळे लसीकरण कार्यक्रमात प्रशासनाने लक्ष घालून राजकीय मंडळींचा हस्तक्षेप रोकावा अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे
COMMENTS