पुणे पिंपळे गुरव ( संजय मराठे ) पिंपळे गुरव,लेवा भातृ मंडळ यांच्या मार्फत सध्याच्या कोविड काळात गरजू कोविड ग्रस्तांना वैद्यकीय सहायताद्वार...
पुणे पिंपळे गुरव ( संजय मराठे )
पिंपळे गुरव,लेवा भातृ मंडळ यांच्या मार्फत सध्याच्या कोविड काळात गरजू कोविड ग्रस्तांना वैद्यकीय सहायताद्वारे दिलासा देण्याकरिता दहा लिटर क्षमतेचे २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स व २ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे.सदर वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण उद्योगनगरीतील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक मा.नगरसेवक शंकरशेठ पांडुरंग जगताप,नगरसेवक शत्रुघ्न काटे,यांच्या हस्ते व लेवा भ्रातृ मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे,कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे,सचिव निर्मल गाजरे, कार्याध्यक्ष संदीप भोळे व पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते माउलीशेठ जगताप,हरिभाऊ पाटील,ओम खडसे,अविनाश खडसे आणि उत्कर्ष खडसे अशा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत व सोशल डीस्टन्सिंगच्या शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला.
त्या वेळी माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांनी या संस्थेने हा जो उपक्रम केला आहे या उपक्रमा मुळे खूप नागरिकांना याचा फायदा होणार आहे या संस्थे ची प्रेरणा घेऊन आणखीन संस्था पुढे आल्या तर आपल्या पिंपरी-चिंचवड मध्ये खूप मोठे वैद्यकीय क्षेत्र मध्ये भरीव कामगिरी होईल.म्हणून मी लेवा भातृ मंडळ या संस्थेचे आभार व्यक्त करतो.
COMMENTS