Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

    विभागनिहाय जबाबदारी केली निश्चित पुणे  ( प्रतिनिधी ) -   जिल्ह्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व...

  विभागनिहाय जबाबदारी केली निश्चित


पुणे ( प्रतिनिधी ) -

 जिल्ह्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे  अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

 राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 13 मार्च 2020 पासून भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 लागू करून त्यामधील तरतुदीनुसार अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 29/04/2021 रोजीच्या आदेशान्वये 1 मे 2021 ते 15 मे 2021 कोविड 19 संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व बैठकीस विभागाच्या अधिका-यांना व विभाग प्रमुखांना बैठकीस बोलविणे शक्य नसल्याने परिपत्रकाद्वारे संबंधित सर्व अधिकारी व विभाग प्रमुख यांना पावसाळ्यापूर्वी सर्व पूर्व तयारीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

पाटबंधारे विभाग

जिल्हयातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन अहवाल सादर करावा.

पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाची उपाययोजना याबाबत आराखडा निश्चित करणे. उदा. धरण सुरक्षा

मुख्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करणेसमन्वय अधिकारी यांची नेमणुक करावी.

धरणातील सोडण्यात येणा-या पाण्याबाबत नागरिकांना सूचना करणेत्याचबरोबर जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षाला कळविणेअधिकृत सक्षम अधिका-याच्या मदतीने पाणी सोडावयाचे की नाही  याबाबत निर्णय घेणे.

मोठया क्षमतेच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांची नेमणुक करणे आणि नियंत्रणाचे कार्य करणे.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. अशा ठिकाणी शोध आणि बचाव करण्यासाठी पाणी उपसण्याकरीता पंपजनरेटर्सबुलडोझर्सबोटइत्यादींची सोय करणे.

नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटया इतर धोक्यांच्या ठिकाणाचा अभ्यास करून त्याची माहिती घेणे व नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे.

पूर रेषा मार्क करणेनदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणेबाबत कार्यवाही करणे. जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी (Structural Audit) पावसाळ्यापूर्वी करुन घेण्यात यावे.

धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी.

धरणाच्या खालील बाजूस असलेल्या पुरामुळे संभाव्य बाधीत गावांची यादी तयार करुन जिल्हा नियंत्रण कक्षात देण्यात यावी. त्यासाठी सर्वेक्षण करावे.

पुणे जिल्हयातील जनता वसाहत मुठा कालव्याप्रमाणे आपत्ती घडु नये याबाबत पाटबंधारे विभागाकडून दक्षता घेण्यात यावी.

पाटबंधारे विभाग व छोटे पाटबंधारे जिल्हा परिषद पुणे या विभागांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा आठ  दिवसात तयार करुन अद्यावत माहितीसह  सादर करावा.

जिल्हा नियंत्रण कक्षासाठी मान्सुन कालावधीसाठी वर्ग 2 दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ यांचेमार्फत दिनांक 1 जुनपासून पावसाळा कालावधी पुर्ण होईपर्यंत नेमणुक करण्यात यावी.

जिल्हा नियंत्रण कक्षात पावसाळा कालावधीसाठी आपले विभागाकडील स्वतंत्र वाहनचालकासह वाहन देण्यात यावे.

धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून (पोलीस,सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निश्चित करावा. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावे. धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमानपत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग /बांधकाम विभागजिल्हा परिषद पुणे विभाग

आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील  साहित्याची माहिती ऑनलाईन अद्यावत करणे.

पुणे जिल्हयातील धोकादायक पुलांची पावसाळयापूर्वी पाहणी करुन घेण्यात यावी.

जिल्हयातील जुन्या इमारती / वाडे बांधकाम तपासणी (Stuructural Audit) पावसाळयापुर्वी करुन घेण्यात यावे. आपले कार्यालयाकडील अधिकारीतहसिलदारगटविकास अधिकारीपोलीस निरीक्षकयांचा समन्वय असणेआवश्यक आहे. उदा. एखादे झाड रस्त्यावर पडले तर तात्काळ कार्यवाही करावी.

 मान्सून पूर्वी सर्व रस्त्यांचे साईड पटटे भरुन घ्यावीत.

महामार्गालगत,रस्त्यालगत उत्खणनामुळे बंद झालेल्या मो-या कार्यान्वित करणेजेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल. उदा. खेड शिवापूर दुर्घटनाआणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी यंत्रे उदा. बुलडोझर्सवॉटर टँकर्सडंपर्सअर्थमुव्हर्सडिवॉटरींग पंप्सजनरेटर्सट्री कटर्सफल्ड लाईटआर.सी.सी. कटर्सइत्यादी साहित्याची निगा राखणे तसेच ते चालू स्थितीमध्ये आहे याची खात्री करणे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन अद्यावत माहितीसह या कार्यालयास सादर करावा.

धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.

 

जिल्हा शल्यचिकीत्सक / ससून सर्वोपचार रुग्णालयपुणे

 आपत्ती व्यवस्थापन आराखडा तात्काळ तयार करुन अद्यावत माहितीसह या कार्यालयास सादर करावा.

पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.

आपत्तीच्या काळामध्ये अॅम्ब्युलन्सचा आराखडा तयार करणे.

आपत्कालीन अॅम्ब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा.

आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह यादी जिल्हा नियंत्रण कक्षास देणे

सर्व अॅम्ब्युलन्स गाडया प्रादेशिक परिवहन विभागामार्फत तपासणी करून घ्यावी. गाडीच्या सुस्थितीत असल्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. सदरची कार्यवाही तात्काळ करावी.

 

आरोग्य विभागजिल्हा परिषदपुणे

पुरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करणे.

आपत्तीच्या काळामध्ये अॅम्ब्युलन्सचा टोल फ्री क्रमांक 108 सर्व विभागांना देण्यात यावा.

आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह यादी जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात यावी.

पावसाळयाच्या कालावधीमध्ये साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून उपाय योजना करावी.

आपत्तीमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये काम करणा-या प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती संकलित करावी.

प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उपलब्ध असलेली सर्व उपकरणेयंत्रेसुस्थितीत व चालु स्थितीमध्ये आहेत अगर कसे  याबाबत शहानिशा करावी. उदा. अॅम्ब्युलन्सजीपजनरेटर इत्यादी

तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष उभारणे,

आणिबाणीच्या कामासाठी स्थानिक डॉक्टर किंवा स्थानिक स्वयंसेवक संघटना इत्यादींना तातडीने एकत्रित करणे.

 

जिल्हा अधिक्षक कृषि विभाग / कृषी विभागजिल्हा परिषदपुणे

तहसिलदारतालुका कृषि अधिकारी यांचे समन्वय असणे आवश्यक असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करुन त्या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी. तसेच गारपीटअवकाळी पाऊस झाल्यासझाल्या पिकांचे फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल या कार्यालयास सादर करावेत. 

कृषि विभागाचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात यावा.

आदर्श तक्ता अद्यावत असणे आवश्यक आहे. 

तलाठीग्रामसेवककृषि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्याची समिती पावसाळ्यापुर्वी तयार करण्यात यावी.

पुर परिस्थितीमध्ये बाधीत पिकांचे पंचनामे करुन नुकसानीचे मुल्य ठरविणे.

ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यामधील माहिती तहसिलदार यांच्याकडे सादर करणेशेतीच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तहसिलदारांच्या मदतीने पथक तयार करणे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे व कृषि अधिकारी जिल्हा परिषदपुणे यांनी पावसाची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर करुन त्यामध्ये दररोज नोंद घ्यावी . जिल्हा नियंत्रण कक्षात स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी.

 

पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,छावणी नगरपरिषद सर्व नगरपरिषद : पुर नियंत्रण आराखडा तयार करणे.

शहरी भागात निधीलगत झोपडपटयामध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करणेजेणेकरुन त्या भागात रहाणा-या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करणे सोपे जोईल व आराखडा तयार करण्यात यावा.

पावसाळयात वादळी वा-यासह झाडे उन्मळून पडुन मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून धोकादायक वृक्षाची छाटणी करावी. महानगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या हद्यीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास देणे. नदीपात्रालगत पात्रातील झोपडपटटया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करुन योजना ठरविणे व नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे.

नदी पात्रातील गाळ तसेच जलपर्णी काढणेतसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करणेगटार सफाई करणे व औषधी फवारणी करणे.

पालिकेच्या हद्यीतील सर्व जुन्या इमारतीचे वाडयाचे बांधकाम तपासणी (Stuructural Audit) पावसाळ्यापूर्वी करुन घेण्यात यावी.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणेनियंत्रण कक्षामध्ये नोडल ऑफिसरची नेमणुक करणे. तसेच ज्यांनी फायर विभागाची ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाहीअशा हॉस्पीटल,इमारती यांचेवर कार्यवाही करणेआवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत्याप्रमाणे फायर विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाहीअशा इमारतीहॉस्पिटल यांची तपासणी करण्यात यावी. याबातचा अहवाल दोन्ही महानगरपालिकांनी या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करावा. याबाबत अहवाल सादर न केल्यास अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कार्यवाही केली जाईल.

नगरपरिषद लोणावळा यांनी भुशी डॅम या ठिकाणी गर्दी होत असते या ठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक पथक नियुक्ती करण्यात यावे. आराखडा तयार करण्यात यावा.

नदीपात्रामध्ये गाडया पार्किंग केल्या जातात. धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळेस अथवा पावसाळयात अनेकदा नदीपात्र पूर्ण भरल्यानंतर नदीपात्रात पार्किंग केलेल्या गाडया वाहुन गेल्या आहेत याबाबत पुणे महानगरपालिका यांनी दक्षता घ्यावी.

धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.धोका असणाऱ्या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी..

 

पोलीस आयुक्तालय पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड / पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पोलीसअधिक्षक राष्ट्रीय महामार्ग / एन. डी. आर. एफ./होमगार्ड

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक अंदाज घेवून अधिकारी/कर्मचारी यांचेशी सल्लामसलत करणे.

आपत्तीचे वेळी नियंत्रण कक्ष प्रमुखाची नियुक्ती करणे. आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क नंबरसह यादी ठेवणे.

शोध व बचाव कार्य यासाठी लागणाऱ्या उपकरणांची उपलब्धता याबाबत पूर्व तयारी करणे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित होतो परिणामी वाहतुक व्यवस्था कोलमडते त्यासाठी पर्यायी

रस्त्याचा वापर करण्याबाबत उपाययोजना करणे.

आपत्तीच्या काळात जखमी लोकांना प्राधान्याने रुग्णालयामध्ये हलविणेतसेच रुग्णालयाच्या ठिकाणी जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे.

 बाधित झालेल्या भागामध्ये स्थावर मालमत्ता व मौल्यवान गोष्टीवर देखरेख ठेवणे. बाधित झालेल्या भागामध्ये बघे लोकवाहने इत्यांदीवर नियंत्रण ठेवणे.

नदीपात्रालगत पात्रातील झोपडपट्टया व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करुन योजना ठरविणे व नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याबाबत कार्यवाही करणे.

आपत्तीच्या काळात शोध व बचाव कार्यासाठी स्वतंत्र गटाची स्थापना करणे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.

नगरपरिषद लोणावळा भुशी डॅम या ठिकाणी गर्दी होत असते आवश्यक तो पोलीस बंदोबस्त व जीवरक्षक पथक नियुक्ती करण्यात यावी.

पुणे शहर पोलीस आयुक्तालया मार्फत महानगरपालिका पुणे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पथकाची नियुक्ती करण्यात यावी.

पोलीस अधिक्षक ग्रामीण यांनी मान्सून कालावधीसाठी 1 जून पासून जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये 24 तासासाठी पथकाची नियुक्ती करण्यात यावी.

धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग,वन विभाग,पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.धोका असणान्या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी,

उपविभागीय अधिकारी / तहसिलदार

तालुकास्तरावर सर्व तालुका स्तरावरील विभागांची बैठक घेण्यात यावी.

आवश्यक असणा-या साहित्याची तसेच उपलब्ध असणा-या साहित्याची यादी तयार करण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी कर्मचारी यांचे नांवेफोन नंबर यांची माहिती अद्यावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या आदेशाची एक प्रत सादर करावी.

रेनगेज स्टेशनची सद्यस्थिती पडताळून कार्यान्वित करणे व तसा अहवाल सादर करणे.

नद्या नाले यातील गाळ काढणे व औषधांची फवारणी करुन घेणे.

धोकादायक रस्ते पुलइमारतीधरणे इत्यादींचे सर्वेक्षण करणे व तपासणी करणे.

तालुका स्तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणेनियंत्रण कक्षामध्ये नोडल ऑफिसरची नेमणुक करणे.

पावसाची आकडेवारी व नुकसानीबाबतची माहिती सकाळी 8.00 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास कळविणे. पोहणा-या  व्यक्तींची यादी तयार करणेशोध व बचाव करणा-या संस्थांची यादी तयार करणे.

पावसाळयाच्या काळात मंडळ अधिकारीतलाठीग्रामसेवक यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या प्रकल्पांतर्गत पावसाळा कालावधीतील पूरामुळे बाधीत होणा-या क्षेत्राची यादी तयार करावी व पावसाळयापूर्वी सदरचे काम करुन घेण्यात यावी. उदा. नदीपात्रात होणारे बांधकामतसेच अनधिकृत बांधकाम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अखत्यारीत जादा प्रमाणात आहेत.

अनधिकृत बांधकामाबाबत कार्यवाही करण्यात यावी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तात्काळ या कार्यालयास सादर करावा.

नागरी संरक्षण दल / राष्ट्रीय सेवा योजना-

नागरी संरक्षण दलाच्या विभागा मार्फत वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करावे.

राष्ट्रीय सेवा योजना मार्फत शोध व बचाव करण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्यात यावा.

1 जून पासुन नागरी संरक्षण दलातील कर्मचारी जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये नेमणूक करावी.

अधिक्षक अभियंता शहरी व ग्रामीण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पुणे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पावसाळयाच्या कालावधीमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.

नियंत्रण कक्षामध्ये नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी व त्यांचे नाव संपर्क क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्षात द्यावा.

जमिनीखालील विज लाईन टाकताना खोदकाम केले असेल तर पावसाळयापूर्वी खड्डे बुजविण्यात  यावे जेणेकरुन सोसायटीमध्ये पाणी शिरणार नाहीयाची खात्री करावी.

आपत्तीच्या काळात विज खंडीत झाल्यास तातडीच्या दुरुस्तीसाठी सुसज्य पथक तयार ठेवावे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पथकाची नियुक्ती करण्यात यावी.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

भारतीय संचार निगम लिमिटेड

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्तीच्या बाबतीमध्ये माहिती हवी असल्यास जिल्हयातील नागरीकांना ती दूरध्वनीवरून विनाशुल्क उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करणे.

आपत्ती काळात दूरध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये. तसेच अत्यावश्यक दूरध्वनी कनेक्शन कट करणेत येऊ नये,

आपत्ती काळात संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी मोबाईल टॉवर सुसज्ज ठेवावे.

जिल्हयातील संपर्कहीन गावांचा सर्वे करुन संपर्क प्रस्थापित करण्यासाठी योजना राबवावी.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तात्काळ या कार्यालयास सादर करावा.

जिल्ह्यातील विविध विभागामधील नियंत्रण कक्षामधील टेलीफोन बंद पडणार नाही यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेडचे पथक नियुक्त करावे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग

आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा व नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी. पावसाळयामध्ये ब-याच वेळा टँकर उलटतात त्यासंबंधी निगडीत असलेल्या कंपनीशी संपर्क साधून त्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देणे. उदा. वायुपेट्रोलडिझेल इत्यादी गळती

जिल्हयातील धोका प्रवण कंपन्यांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन जिल्हा नियंत्रण कक्षात देण्यात यावा.

हवामान विभाग

पावसाच्या अंदाजाविषयी हवामान खात्यातून आगाऊ सूचना देण्यात याव्यातउदा. पाऊसवीजभुकंप इ. तसेच हवामान विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या नोडल ऑफिसरचा दूरध्वनी व मोबाईल नंबर आपत्ती संबंधित सर्व विभागास देणे.

आपत्ती व्यवस्थापन विभागजिल्हाधिकारी कार्यालय पुणे

जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये कर्मचारी नेमणुक करणे.

पाटबंधारे विभागात सार्वजनिक बांधकाम विभागनागरी संरक्षण दलहोमगार्डजिल्हा परिषद इत्यादी विभागातील कर्मचारी यांची नियुक्ती जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात यावी.

पावसाची आकडेवारीचा अहवाल तयार करण्यासाठी पावसाळा कालावधीपर्यंत महसुल विभागातील एका लिपीकाची नियुक्ती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात यावी.

 

आकाशवाणी पुणे व दुरदर्शन विभाग पुणे

जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात येणा-या आपत्तीबाबत पुर्वसुचना प्रसारीत करणे.

 

जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी व पुरवठा अधिकारी

पूर प्रवण व दुर्गम गावामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणे(स्वस्त धान्य दुकानामध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणे

 

पुणे मेट्रो

मेट्रो प्रकल्पांतर्गत मोठया प्रमाणात कामे चालू आहे. त्यामध्ये मोठया प्रमाणात खोदकाम केले आहे. सदरची कामे पावसाळयापूर्वी करणे आवश्यक आहे. उदा. मेट्रो प्रकल्पनदीपात्रात होणारे बांधकाम तसेच मेट्रोचे काम चालू आहे. त्याठिकाणी ट्रॅफिक होत असल्याने सुरक्षा गार्डसुरक्षारक्षक अशा यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यातयाबाबत पोलीस यंत्रणाशी समन्वय ठेवण्यात यावा.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन या कार्यालयास सादर करावा.

 

जिल्हा माहिती अधिकारी

जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत देण्यात येणा-या आपत्तीबाबत पुर्वसुचना प्रसारीत करणे.

धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

 

प्रादेशिक परिवहन विभाग

नदीपात्रामध्ये गाडया पाकींग केल्या जातात. धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळेस अथवा पावसाळ्यात अनेकदा नदीपात्र पूर्ण भरल्यानंतर नदीपात्रात पाकींग केलेल्या गाडया वाहून गेल्या आहेतयाबाबत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी दक्षता घ्यावी.

वाहनाचे फिटनेस सटीफिकेट मुदती बाहय झालेले असतात ते संबंधीतांनी अद्यावत करुन घ्यावे.

 

वन विभाग

पुणे जिल्हयातील बराच भाग वनक्षेत्रात येत असल्याने वन विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा.

लोकवस्ती जवळील धोकादायक ठिकाणांचे (दरडीबाबत) सर्वेक्षण करण्यात यावे.

वन विभागांच्या क्षेत्रात किंवा लगत आपत्ती निर्माण होणार नाही याची दक्षता वन विभागाने घेण्यात लागणे.

जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. त्याची माहिती सर्व विभागांना देण्यात यावी. यावी. उदा. आग धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस / सार्वजनिक बांधकाम विभाग / वनविभाग / पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.

प्रादेशिक व्यवस्थापकमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळपुणे / पुरातत्व विभाग

पुणे जिल्हयातील पर्यटन स्थळांबाबत सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी यादी तयार करण्यात यावी.

धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करुन (पोलीस / सार्वजनिक बांधकाम विभाग / वन विभाग विभाग/पुरातत्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.

धोका असणा-या ठिकाणांबाबत स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.

पर्यटन विभागांकडे असलेल्या साहित्याची माहिती देण्यात यावी व सदरचे साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे.

पुणे जिल्हयातील पावसाळा कालावधीमध्ये इतर कालावधीमध्ये पुणे जिल्हयातुन व बाहेरील जिल्हयातील तसेच

राज्यातून पर्यटक येत असतात. त्यासाठी पुणे जिल्हयाचा पर्यटनाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा.

रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी कार्यालयपुणे

पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.

आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळ्या नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.

वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल आणि सर्वेक्षण यंत्रणापुणे

पुणे जिल्ह्यातील भोरवेल्हामावळमुळशीखेडआंबेगावजुन्नर व इतर ठिकाणी संभाव्य दरड कोसळणारा भाग आहे. अशा ठिकाणांचा सर्वे करून संरक्षणात्मक उपाय योजना करण्यासाठी आपल्या स्तरावरील पावसाळा कालावधीसाठी स्वतंत्र  टिम तयार करण्यात यावी.

पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.

आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळया नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.

जिल्हा परिषदपुणे

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सर्व विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा. कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे पावसाळा कालावधीमध्ये पावसाची आकडेवारी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांची नियुक्ती करुन पावसाची आकडेवारी दररोज नियंत्रण कक्षामार्फत घेऊन रजिस्टर अद्यावत करावे.

आपल्या कार्यालयास लागणारी वेगवेगळ्या नमुन्यातील पावसाची आकडेवारी आपल्या कार्यालयामार्फत तयार करण्यात यावी.


COMMENTS

BLOGGER: 1
  1. Dr.Rajesh Deshmukh is the best administrator &+veness seen at each stage Be ahead.
    Mahendra Patil Fso Greater Mumbai.

    ReplyDelete

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,89,Crime,48,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,131,Maharastra,4,Politics,42,Religion,161,Sports,8,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक व पूर्व तयारीची कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
https://1.bp.blogspot.com/-Sco2H5AioqI/YJI1fllyLdI/AAAAAAAAExg/VjVIja_kTAkqRpRXnZsD-_b2IT3CUGrXgCLcBGAsYHQ/w400-h300/77603316.jpg
https://1.bp.blogspot.com/-Sco2H5AioqI/YJI1fllyLdI/AAAAAAAAExg/VjVIja_kTAkqRpRXnZsD-_b2IT3CUGrXgCLcBGAsYHQ/s72-w400-c-h300/77603316.jpg
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/05/Pune%20Collector%20Dr%20Rajesh%20Deshmukh.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/05/Pune%20Collector%20Dr%20Rajesh%20Deshmukh.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content