पुणे पिंपळे गुरव ( संजय मराठे ) - कै.दत्तात्रेय आनंदराव भोसले(वय ५५) मुळगाव तांदळवाडी,ता.बारामती,जि.पुणे,सध्या रा.चंद्रभागा निवास,आनंदनग...
पुणे पिंपळे गुरव ( संजय मराठे ) -
कै.दत्तात्रेय आनंदराव भोसले(वय ५५) मुळगाव तांदळवाडी,ता.बारामती,जि.पुणे,सध्या रा.चंद्रभागा निवास,आनंदनगर,जुनी सांगवी,पुणे.यांचे आज दि. १५-५-२०२१ शनिवार रात्री ९.३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या या आकस्मिक निधनाने समाजाने एक खूप मोठे व्यक्तीमत्त्व गमाविले आहे. त्यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रा मध्ये खूप मोठे कामे केले होते. इंद्रप्रस्थ चौका मध्ये त्यांचे शिवामृत वॉटर सप्लायर व वॉशिंग सेंटर आहे. याच माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना मोफत पाणी दिले होते. त्यांनी त्यांच्या वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक वाहने सॅनिटराईज करून देत होते.दर वर्षी महाशिवरात्रीला इंद्रप्रस्थ चौकातील महादेवाच्या मूर्तीचा सकाळी अभिषेक करून दिवस भर नागरिकांना प्रसाद वाटप करून संध्याकाळी तेथे भजनांचा कार्यक्रम घेत असे.त्यांच्या या धार्मिक कार्याला स्थानिक पत्रकार मित्र सुद्धा त्यांना मदत करीत असे त्यांचे हे कार्य पाहून स्थानिक नागरिक त्यांचे नेहमी कौतुक करीत असे.तसेच ते त्यांनी दार वर्षी अनेक ठिकाणी झाडे लावली आहेत.झाडे लावून न थांबता त्यांनी खुप झाडांना नित्य नियमित पाणी देऊन त्यांचे आज वर जतन केले आहे.ते वृक्ष प्रेमी होते.दर वर्षी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला त्यांच्या शिवामृत वॉटर सप्लाय कडून पाण्याचे न चुकता वाटप होत असे.त्यांनी त्यांच्या वॉशिंग सेंटर समोर भटक्या जनावरांसाठी एक सुंदर जल कुंड तयार केले आहे.त्यामध्ये दिवसभर तेथील भटकी जनावरे ऊन्हा तान्हातून येऊन त्यांची तहान भागवत असे.ते नेहमी त्यांच्याकडे येणार्या व्यक्तीशी हसत मुखी राहून व प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान देऊन आपली प्रेमळ भावना दाखवायचे.अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे कै.दत्तात्रय भोसले आपल्यातून अचानक जाण्याने सर्व नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून असा परिवार आहे.नवी सांगवी येथील शिवामृत चौक येथे त्यांचा शिवामृत वॉटर सप्लाय,वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता.पिंपळे गुरव,नवी सांगवी,सांगवी या परिसरात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मित्र म्हणून त्यांची ओळख होती.
COMMENTS