Mahakaleswar Multicity Nidhi LTD

Mahakaleswar Multicity Nidhi LTD
Mahakaleswar Multicity Nidhi LTD

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे – पालकमंत्री आदित्य ठाकरे

  मुंबई ( प्रतिनिधी ) -   मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱ्या अडीअडच...

 


मुंबई ( प्रतिनिधी )
- मुंबईत करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक विविध उपाययोजनांची अंमलबजावणी, लसीकरण, त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे आदींसंदर्भात तसेच या कामांमध्ये मुंबई महापालिका, पोलीस दल यांच्यामध्ये समन्वय वाढविण्याच्या अनुषंगाने आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेतली. मुंबईतील पावसाळापूर्व कामांच्या प्रगतीचीही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मुंबईतील महापालिका झोन्सचे उपायुक्त, पोलीस उपायुक्त, वॉर्ड ऑफीसर, संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

पालकमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शहरातील कोविड केअर सेंटर्स, जम्बो सेंटर्स,  लसीकरण केंद्रे, आयसीयू सुविधा उपलब्ध असलेले सेंटर्स यांचे मॅपींग करणे आवश्यक आहे. जेणेकरुन कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकेल. खाजगी, स्वयंसेवी संस्थांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर्सची माहितीही या मॅपींगमध्ये घेण्यात यावी. शिवाय खाजगी केंद्रांकडे असलेली औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींची माहिती घेऊन प्रशासनाने त्यांना आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंबईमध्ये जंबो कोविड केअर सेंटरमध्ये लवकरच सुमारे 7 हजार ऑक्सिजन बेड्स तसेच सुमारे 2 हजार आयसीयू/एचडीयू बेड्सची उपलब्धता करण्यात येत आहे. शिवाय जिथे शक्य आहे तिथे पेडियॅट्रीक केअर सेंटरही निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. शहरात कोविड रुग्णांना उपचार साधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार थोपविण्याच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा असून सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे. कोरोना प्रतिबंधासाठी पोलीस यंत्रणेमार्फतही चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईतील पावसाळापूर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने चालू महिना महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कामगारांचे होणारे स्थलांतर याचीही माहिती घेऊन त्याअनुषंगाने पावसाळापूर्व कामांचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

COMMENTS

mmnl

mmnl
Name

AD SPACE,5,Breaking,88,Crime,46,Entertainment,11,Health,37,India,20,Maharashtra,111,Maharastra,4,Politics,38,Religion,150,Sports,7,Technology,10,World,6,
ltr
item
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र: कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे – पालकमंत्री आदित्य ठाकरे
कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने कामकाज करावे – पालकमंत्री आदित्य ठाकरे
https://1.bp.blogspot.com/-JD2rN4-p3EU/YJIrIg3fq9I/AAAAAAAAExM/3LAUnr5da2sxSmKRPNVw4bD5p1aOV9-4QCLcBGAsYHQ/w400-h296/aaditya-thackeray.png
https://1.bp.blogspot.com/-JD2rN4-p3EU/YJIrIg3fq9I/AAAAAAAAExM/3LAUnr5da2sxSmKRPNVw4bD5p1aOV9-4QCLcBGAsYHQ/s72-w400-c-h296/aaditya-thackeray.png
जागृत शोध : संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे एकमेव मराठी वृत्तपत्र
https://www.jagrutshodh.com/2021/05/Mini%20Aditya%20Thakare.html
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/
https://www.jagrutshodh.com/2021/05/Mini%20Aditya%20Thakare.html
true
2671704176832452975
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content