शिरूर ( प्रतिनिधी ) - अरुणराव भाऊसाहेब लोळगे (गुरुजी)यांचे गुरुवार दिनांक.13/05/2021 रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते शिर...
शिरूर ( प्रतिनिधी ) - अरुणराव भाऊसाहेब लोळगे (गुरुजी)यांचे गुरुवार दिनांक.13/05/2021 रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते शिरूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र लोळगे यांचे वडील होते. व्यवसायाने शिक्षक असणारे लोळगे गुरुजी हे मुळचे गारगुंडीचे व कालांतराने नोकरी निमित्ताने गोडसेवाडी, मालुंजा,वाडेगव्हाण,निघोज, वडनेर येथे अनेक विदयार्थी घडवले व देविभोयरे या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी शिक्षक म्हणून त्यांच्या काळात अनेक चांगले विदयार्थी घडवले. लोळगे गुरुजी हे शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ व शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख होती. सेवानिवृत्ती नंतर ते निघोज येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा लोळगे सेवानिवृत्त शिक्षिका व राजेंद्र लोळगे,प्रशांत लोळगे,राहुल लोळगे ही मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.शिरूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुवर्णाताई राजेंद्र लोळगे यांचे ते सासरे होते.
COMMENTS