कोरेगाव-भीमा ( प्रतिनिधी ) शंकर पाबळे कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे येथील डिंग्रजवाडी हद्दीमधील कचरू शंकर बवले या शेतकऱ्यांच्या शेतामध्य...
कोरेगाव-भीमा ( प्रतिनिधी ) शंकर पाबळे
कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे येथील डिंग्रजवाडी हद्दीमधील कचरू शंकर बवले या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मागील अनेक वर्षापासून शेजारी असलेल्या एस्सार स्टील कंपनीतून पावसाचे पाणी सोडले जात असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी कचरू बवले यांना संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे ..
सध्या पावसाळा सीझन सुरु असल्याने सर्वत्र पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पावसाचे पाणी व चक्रीवादळ यांसारखे संकटांना सामोरे जावे लागत आहेत तर वेळोवेळी शासन याकडे लक्ष देऊन अनेक शेतकऱ्यांची मदत ही करत आहेच.
परंतु कोरेगाव-भीमा येथील शेतकरी कचरू बवले यांच्या शेतात एस्सार स्टील कंपनी मधील सोडले जाणारे पावसाच्या पाण्यामुळे शेतीची नासाडी होत आहे तर विहिरी मध्ये ही पाण्यासोबत येणारे दगड माती यामुळे गाळ साठत आहे तर मोटार मध्ये कचरा जाऊन बिघाड होत आहे परंतु याकडे कोणीही फिरकुन पाहत नसल्याने शेतकरी कचरू बवलें यांना आता तीव्र संताप व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे..
तर या प्रकाराबाबत मागील काही वर्षापासून कचरू बवले यांनी कंपनीतील सोडले जाणारे पाऊसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसाना बद्दल एस्सार स्टील कंपनीतील कर्मचारी सुरेश कदम यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून कंपनीतील सोडले जाणारे पावसाचे पाणी याबद्दल काहीतरी उपाय करावे अशी वारंवार विनंती करूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने बवले यांनी एस्सार कंपनीची तक्रार डिंग्रजवाडी ग्रामपंचायत मध्ये केली परंतु इथेहि डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने बवले यांनी शिरूरचे तहसीलदार कार्यालय कोरेगाव-भीमा मधील तलाठी कार्यालय तसेच अनेक लहान-मोठे नेतेमंडळी यांनाही अर्जाद्वारे कंपनीतील पावसाच्या पाण्यापासून होणारे नुकसाना पासून न्याय मिळवण्याबाबत विनंती अर्ज सादर केले आहेत परंतु शेतकरी कचरू बवले यांच्या मदतीस कोणीही प्रतिसाद देत नसल्याने येथील शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करू लागले आहे.
तर हा प्रश्न आता कोण मार्गी लावेल? याकडे आता शेतकरी कचरू बवले व शेजारील सर्व शेतकऱ्यांची लक्ष केंद्रित होत असल्याने दिसू लागले आहे..
पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही स्वतः काँक्रिटचे चार फूट उंचीचे बांधकाम करून तसेच ड्रेनेज लाईन तयार केली आहे परंतु समोरील ग्लोबल टावर कंपनीने ड्रेनेज लाईन अडवल्याने तसेच सणसवाडी हद्दीतून आमच्या कंपनीत येणारे एकत्रित पावसाचे पाणी हे कचरू बवले यांची शेतजमीन ही लवनात असल्याने पावसाचे पाणी झिरपत झिरपत त्यांच्या शेतात जात आहे .
तरी ग्लोबल टावर कंपनीने जर त्यांच्या ड्रेनेज लाईनशी आमच्या ड्रेनेज लाईन ला जोडण्याची परवानगी दिली तर काय खर्च असेल तो आम्ही करण्यास तयार आहोत.
- सुरेश कदम (कर्मचारी एस्सार स्टील)
COMMENTS