शिरूर ( प्रतिनिधी ) - दिनांक २७ मे २०२१ रोजी पालक संघटना समिती शिरूर यांनी तहसीलदार शिरूर, गटशिक्षण अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना RMD श...
शिरूर ( प्रतिनिधी ) - दिनांक २७ मे २०२१ रोजी पालक संघटना समिती शिरूर यांनी तहसीलदार शिरूर, गटशिक्षण अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना RMD शाळा प्रशासन यांच्या विरोधात येत्या ३ जून २०२१ रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले. या प्रसंगी पालक संघटनेचे अध्यक्ष श्री. नाथाभाऊ पाचर्णे, शैलेंद्र शेळके, सोनाली ताई घावटे, योगेश भाऊ ओव्हाळ,फिरोज भाई सय्यद, प्रीती ताई कांडेकर, मनीषा ताई रुके उपस्थित होते.
सध्या कोरोना महामारीचे सावट आहे. जो तो आर्थिक संकटांत अडकला आहे. गेल्या मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन् झाल्यामुळे सर्व् व्यवहार, व्यापार, उद्योग,नोकरी व्यवसाय ठप्प झाले आहेत. यातच सर्व शिक्षण संस्था, महाविद्यालये हे सुध्धा बंद आहेत. हे सर्व घडत असताना खाजगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली. परंतु या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा हेतू मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फी वसुली करण्याकरता वापर करण्यात आला. सर्वत्र आर्थिक संकट असताना वर्षानुवर्ष लाखो रुपये नफा कमावणाऱ्या शिक्षण संस्था यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची फी माफ करायला हवी होती परंतु असे न करता सक्तीने फी वसुली करण्याचे काम चालू केले.या साठी ते पालकांना वारंवार फोन करून शाळेनी ऑनलाईन शिक्षणासाठी बनवलेले व्हॉटसअप ग्रुप मधून पालकांना काढून टाकने, परीक्षा साठी फाईल न देणे, तसेच फी साठी दबाव टाकने अश्या प्रकारे पालकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार या खाजगी शाळांनी सुरू केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या विरोधात सर्व पालकांनी एकत्र येऊन पालक संघटना स्थापन करून मा. तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी, शाळा प्रशासन यांना वारंवार निवेदन देऊन विनंती करण्यात आली. परंतु या मध्ये पालकांच्या चर्चेला दाद दिली नाही तसेच यामध्ये प्रशासनाकडून या मुजोर शाळां वर कोणतीही कारवाई न केल्यामुळे अखेर पालकांना आंदोलन करण्याची वेळ आली.
जर येत्या ३ जून २०२१ पर्यंत प्रशासनाकडून या विषयात निर्णय झाला नाही तर पालक संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे.आणि यामुळे तयार होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देन्यात आला आहे.
तरी या कोरोना परिस्थिती मध्ये समाजाची आर्थिक परिस्थितीचा संवेदनशील रीत्या विचार करून सर्व पालकांना न्याय मिळावा ही मागणी पालक संघटनेकडून करण्यात येत आहे. जर ही आमची मागणी मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा श्री. नाथाभाऊ पाचर्णे अध्यक्ष व सर्व पालक संघटना समिती सदस्य शिरूर यांनी दिला आहे.
COMMENTS