कोरेगाव भीमा ( प्रतिनधी ) शंकर पाबळे (हवेली) : पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथ...
कोरेगाव भीमा ( प्रतिनधी ) शंकर पाबळे
(हवेली) : पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील वन विभागात जाऊन स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने व मात्रूत्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आहे.यावेळी एकूण ५१ झाडांची लागवड करण्यात आली असून वनविभागाच्या जागेत याचे रोपण करण्यात आले आहे.
आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती राज्यभर साजरी होत असताना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या बुर्केगाव परिसरात स्तुत्य उपक्रम राबवून ही जयंती साजरी करण्यात आली.सध्या ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता या झाडांपासून इतरांना नैसर्गिक ऑक्सिजनची मिळावा व आरोग्य सर्वांचे चांगले रहावे या दृष्टिकोनातून स्वराज्य बहुजन सेनेच्या वतीने व मात्रूत्व फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला असून संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील व मातृत्व फाउंडेशनचे सचिव अक्षय ठोंबरे यांच्या सह काही कार्यकर्त्यांनी मिळून शासकीय नियमांचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले.यात वड,पिंपळ,उंबर, चिंच,भेंडी,पेरू, आंबे,शिताफळ अशा प्रकारची एकूण ५१ झाडे वनविभागाच्या क्षेत्रात लावण्यात आली.
यावेळी स्वराज्य बहुजन सेनेचे व मातृत्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील,मातृत्व फाऊंडेशनचे सचिव अक्षय ठोंबरे,रासपचे तालुका संघटक मनोज जांभळकर, बूर्केगावचे सामाजिक कार्यकर्ते उमेश जांभळकर,सुनील ठोंबरे,विक्रम ठोंबरे, दीपक कोलपे, गणेश जांभळकर,प्रमोद ठोंबरे, योगेश जांभळकर, बाळू थोरात, विशाल जांभळकर, दीपक जांभळकर,रामभाऊ येनभर,संतोष जांभळकर सरकारी वनविभागाचे आधिकारी बापूसाहेब बाजारे वृक्षारोपण करताना उपस्थित होते.
COMMENTS