पुणे ( प्रतिनिधी ) - आज कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे पण पिंपळे गुरव मधील शु...
पुणे ( प्रतिनिधी ) - आज कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे पण पिंपळे गुरव मधील शुभम गायकवाड या तरुणाने समाजासाठी आपण काही तरी करायचे म्हणून त्याने त्याच्या वाढदिवसा निमित्त 50 हजार रुपयाचा धनादेश माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते आयुश्री कोवीड हॉस्पिटल पिंपळे गुरव यांना सुपूर्त केला.
त्यावेळी शुभम गायकवाड असे म्हणाले की मी दर वर्षी माझा वाढदिवस थाटामाटात साजरा करीत असतो पण आता जे कोरोनाचे महाभयंकर संकट देशावरती आले आहे त्यामुळे आज लोकांना खूप अडचणी येत आहेत,कोणाच्या नोकऱ्या गेल्यात,कोणाचे व्यवसाय बंद झाले,कोणाकडे उपचारासाठी पैसे नाही,कोणाचे उपचारा अभावी मृत्यू झाले, अशा अनेक कारणांमुळे समाजातील हे विदारक चित्र पाहून माझे मन हेलावले आहे,त्यामुळे मी असा निर्णय घेतला की यावर्षी वाढदिवसाला एक ही रुपया खर्च न करता आपल्याकडून गोरगरिबांसाठी छोटीशी मदत म्हणून 50 हजार रुपये आयुश्री कोवीड हॉस्पिटला सुपूर्त केला तेव्हा शुभमला शुभेच्छा देताना शंकरशेठ जगताप असे म्हणाले की असाच आदर्श सर्व तरुणांनी द्यावा व कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना जमेल तशी आपल्या परीने मदत करावी.
त्यावेळी माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप,माऊली शेठ जगताप,शुभम गायकवाड, प्राची गायकवाड,मिलिंद कंक,सतीश कांबळे,राहुल साळुंके,अक्षय काशीद,संजय मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
COMMENTS