ठाणे ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे जिल्ह्याच...
ठाणे ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाक्चौरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. कैलास पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आश्वस्त करणारे आहे. आपण लवकरच कोरोनाला हरविणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन देखील श्री.शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून ठाणे जिल्हावासियांना केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला.
COMMENTS