अमरावती ( प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कार्यातून देशाला ग्रामोन्नती व राष्ट्रीय एकात्मतेची दिशा दिली. ग्रामविकास, ...
अमरावती ( प्रतिनिधी ) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कार्यातून देशाला ग्रामोन्नती व राष्ट्रीय एकात्मतेची दिशा दिली. ग्रामविकास, तसेच सशक्त विधायक तरूणाईच्या जडणघडणीसाठी त्यांचे विचार पिढ्यानपिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांनी मोझरी येथे राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. ‘गावागावांशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे’ अशी प्रेरणा निर्माण करत ग्रामगीतेतून त्यांनी खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला. राष्ट्रीय एकात्मता, समाजप्रबोधन, ग्रामविकास यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
COMMENTS